इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. रविवारी (दि. २९ मे) नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथे झालेल्या या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ७ विकेट्सने बाजी मारत पहिल्यांदा आयपीएल विजेतेपदाला गवसणी घातली. या अंतिम सामन्यासह आयपीएलच्या १५व्या हंगामाची सांगता झाली.
आयपीएल २०२२मध्ये अनेक खेळाडू चमकले, कोणी फलंदाजीत, तर कोणी गोलंदाजीत कमाल दाखवली. अनेक खेळाडूंनी उत्तम क्षेत्ररणाचे प्रदर्शन करताना सर्वांची वाहवा मिळवली. अशाच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर आयपीएलकडून पुरस्कारांचा वर्षाव झाला. यंदाच्या पुरस्कारांच्या यादीत कोणा कोणाची नावे आली आहेत हे थोडक्यात पाहू या.
आयपीएल २०२२चे पुरस्कार
विजेते- गुजरात टायटन्स
उपविजेते- राजस्थान रॉयल्स
अंतिम सामन्यातील सामनावीर- हार्दिक पंड्या, गुजरात टायटन्स
ऑरेंज कॅप- जोस बटलर (८६३ धावा), राजस्थान रॉयल्स
पर्पल कॅप- युझवेंद्र चहल (२७ विकेट्स), राजस्थान रॉयल्स
सर्वाधिक षटकार- जोस बटलर (४५ षटकार), राजस्थान रॉयल्स
सर्वाधिक चौकार- जोस बटलर (८३ चौकार), राजस्थान रॉयल्स
एमर्जिंग प्लेअर- उमरान मलिक, सनरायझर्स हैदराबाद
सर्वोत्तम झेल- एविन लुईस, लखनऊ सुपर जायंट्स
सुपर स्ट्रायकर ऑफ द सिजन – दिनेश कार्तिक, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
गेम चेंजर – जोस बटलर, राजस्थान रॉयल्स
सर्वात वेगवान चेंडू- लॉकी फर्ग्युसन (ताशी १५७.३ किमी) , गुजरात टायटन्स
पॉवर प्लेअर – जोस बटलर, राजस्थान रॉयल्स
व्यॅल्युएबल प्लेअर- जोस बटलर, राजस्थान रॉयल्स
फेअर प्ले अवॉर्ड- राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022: फायनलमधील जबरदस्त फटकेबाजीमुळे हार्दिक पंड्या बनला सामनावीर, पाहा याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’
नाद करा पण आमचा कुठं! आयपीएलची पर्पल कॅप डोक्यावर मिरवणारे गोलंदाज, चहल राजस्थानचा पहिला रॉयल खेळाडू