आयपीएल २०२० चा १३ वा हंगाम युएईमध्ये पार पडत आहे. प्रत्यक्षात चाहत्यांना स्टेडियममध्ये बसून सामना पाहता येत नसला तरीही ते टीव्ही आणि इतर माध्यमांच्यामार्फत सामन्यांचा आनंद लुटत आहेत. तरीही, हंगामाच्या सुरुवातीला चाहत्यांना जोरदार फटकाच बसला होता, जेव्हा त्यांना समजले की त्यांची आवडती स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर युएईत होणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा भाग नसेल.
क्रिकेटविश्वातील सर्वात प्रसिद्ध महिला अँकर्समध्ये मयंती लँगरच्या नावाचा समावेश होतो. परंतु सध्या ती टीव्हीवर अँकरिंग करताना दिसत नाही. ज्यावेळी आयपीएल २०२० ची सुरुवात झाली, तेव्हा यासाठी अँकर्स आणि समालोचन पॅनेलची घोषणाही करण्यात आली होती. त्यावेळी मयंतीला या पॅनेलचा भाग बनवले नव्हते.
यामागील कारण मयंतीने स्वत: सांगितले होते आणि सांगितले होते की, तिला आपल्या मुलाच्या जन्मानंतर क्रिकेट अँकरिंगमधून थोडा ब्रेक घ्यायचा आहे. मयंती सध्या आयपीएलपासून दूर आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. ती नेहमी आपला पती स्टुअर्ट बिन्नी आणि मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
https://www.instagram.com/p/CF6N3QGjpEt/?utm_source=ig_web_copy_link
मयंतीने नुकताच काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोत ती आपल्या पती आणि मुलासोबत दिसत आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, “फॅमिली पोर्ट्रेट.”





