न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात मध्यप्रदेशचा वेगवान गोलंदाज अवेश खान आणि अष्टपैलू व्यंकटेश अय्यर यांचीही निवड झाली आहे. यावेळी मंगळवारी (९ ऑक्टोबर) सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या सामन्यात केरळकडून पराभूत झाल्यानंतर व्यंकटेश अय्यर त्याच्या खोलीत होता. मध्य प्रदेशकडून खेळणाऱ्या अय्यरचा संघ हा सामना हरला होता. याच दरम्यान अष्टपैलू अय्यरसाठी अचानक आणि अनपेक्षितपणे चांगली बातमी आली होती.
सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत केरळविरुद्ध मध्यप्रदेशने सामना गमावल्यानंतर अय्यर आपल्या खोलीत निराश होऊन बसला होता. कुणीतरी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. अय्यरने दरवाजा उघडला आणि त्याचा संघसहकारी आणि मित्र वेगवान गोलंदाज अवेश खान बाहेर उभा होता. त्याने त्याला मोठी आनंदाची बातमी दिली.
व्यंकटेश अय्यर याने एका मुलाखतीत सांगितले की, ‘जेव्हा मी दार उघडले, तेव्हा आवेश हसला आणि ‘भाऊ अभिनंदन’ असे म्हणाला आणि मला मिठी मारली. मला काही समजले नाही. मी अवेशला विचारलं काय झालं. यावर अवेश म्हणाला की, न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी तुझी आणि माझी भारतीय संघात निवड झाली आहे. त्यानंतर मी खूप आनंदी झालो. मी त्याला पुन्हा आनंदाने मिठी मारली.’
एका मुलाखतीत व्यंकटेश अय्यर म्हणाला की, ‘मी खूप आनंदी आहे. यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, मला याची अपेक्षा नव्हती. जेव्हा मी मैदानावर खेळतो तेव्हा मला फक्त चांगली कामगिरी करायची असते आणि माझ्या संघासाठी अधिक धावा करायच्या असतात. यासाठी मी निवडकर्ते, कर्णधार आणि सर्व वरिष्ठ आणि प्रशिक्षकांचा आभारी आहे. भारताची जर्सी घालणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि तो दिवस आला आहे. मी खूप आनंदी आहे.’
अय्यरने आयपीएल २०२१ च्या १० सामन्यांमध्ये ३७० धावा केल्या होत्या ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश होता. याशिवाय त्याने ३ बळीही घेतले. सय्यद मुश्ताक अली चषकामध्येही अय्यरने उत्कृष्ट अष्टपैलू खेळ दाखवला होता. त्याने पाच सामन्यात १५५ धावा केल्या आणि ५ बळीही घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल जिंकल्यानंतर जिमी नीशम आपल्या खुर्चीवरून का हलला नाही? स्वत:च केला खुलासा
गावसकरही झाले बाबर आझमवर प्रभावित; म्हणाले, ‘…तर तो एक महान खेळाडू होईल’
केवळ १३ आंतरराष्ट्रीय टी२० खेळण्याची मिळाली संधी, पण त्याने भारताला मिळवून दिले होते विश्वचषक जेतेपद





