भारत आणि वेस्ट इंडिज (INDvWI) यांच्या दरम्यान कोलकाता येथे तीन सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने मालिका खिशात घातली आहे. मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना रविवारी (२० फेब्रुवारी) सुरू झाला. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातून युवा वेगवान गोलंदाज आवेश खानने (Avesh Khan) आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. (Avesh Khan Debute)
मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात अनेक बदल झाले. विराट कोहली व रिषभ पंत यांनी विश्रांती घेत या तिसऱ्या सामन्यासाठी अनुपलब्ध असल्याचे सांगितले होते. त्यांच्या जागी श्रेयस अय्यर व ऋतुराज गायकवाड यांना संधी देण्यात आली. तसेच, मागील जवळपास वर्षभरापासून नियमितपणे संघासोबत असलेला मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज आवेश खान याला देखील भुवनेश्वर कुमार याच्या जागी आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी दिली गेली. टी२० क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा आवेश ९६ वा क्रिकेटपटू बनला.
Congratulations to Avesh Khan who is all set to make his T20I debut for India. @Paytm #INDvWI pic.twitter.com/1vHk2QLDVM
— BCCI (@BCCI) February 20, 2022
अशी राहिली आहे कारकीर्द
आपल्या वेगवान गोलंदाज साठी ओळखल्या जाणाऱ्या आवेश खानला २०१६ एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकातून ओळख मिळाली होती. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, २०२१ आयपीएल मध्ये तो चांगलाच चर्चेत आला. दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना त्याने १६ सामन्यात २४ बळी मिळवले. त्याच्या याच कामगिरीमुळे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली. मात्र, सराव सामन्यात दुखापतग्रस्त झाला. नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२२ लिलावात लखनऊ सुपरजायंट्स संघाने तब्बल १० कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. यासोबतच तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला होता.
त्याने मध्य प्रदेशसाठी आत्तापर्यंत २७ प्रथमश्रेणी सामने खेळताना १०० बळी मिळवले आहेत. तर, २२ लिस्ट ए सामन्यात १७ व ४८ टी२० सामन्यात ६५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. नमन ओझानंतर जवळपास १२ वर्षांनंतर मध्य प्रदेशच्या क्रिकेटपटूने भारतासाठी पदार्पण केले.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल लिलावात बोली लागली नाही, पण टीम इंडियात एंट्री करणारा कोण आहे सौरभ कुमार? (mahasports.in)