भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा निर्णायक सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले होते. मात्र, भारतीय संघाने खेळाच्या तिन्ही विभागात श्रीलंकेला 91 धावांनी मात देत सामना खिशात घालत वर्षातील पहिला मालिका विजय मिळवला. या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणारा अक्षर पटेल मालिकावीर ठरला. यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया देत आपल्या यशाचे श्रेय कर्णधार हार्दिक पंड्या याला दिले.
सामन्यानंतर बोलताना अक्षर म्हणाला,
“माझ्या फलंदाजीचा संघाला फायदा झाल्याचा मला आनंद झाला. या मालिकेसाठी मी काही वेगळे केले नाही. माझ्या यशाचे श्रेय कर्णधार हार्दिक पंड्याला जाते. त्याने डगआउटमध्ये माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्याने मला मोकळेपणाने खेळण्यास सांगितले. तसेच, अपेक्षित कामगिरी न झाल्यास चिंता न करण्याचे देखील सांगितले. आणि तो माझी काळजी घेईल असेही सांगितले. सामन्याआधी अनेक गोष्टींवर नियोजन झालेले. मात्र, त्यातील काही गोष्टी चुकल्या. मी फक्त खेळावर लक्ष केंद्रित करत होतो.”
कर्णधार हार्दिक याने देखील सामन्यानंतर बोलताना अक्षरचे कौतुक केले. ही मालिका अक्षरसाठी नक्कीच फायद्याची ठरेल. असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
अक्षरने या मालिकेत तीन बळी मिळवले. तसेच, फलंदाजीत उत्कृष्ट योगदान देताना 117 धावा तडकावल्या. पुणे येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने आक्रमक अर्धशतक झळकावलेले. रवींद्र जडेजा संघाबाहेर असल्यापासून त्याने ती जागा भरून काढताना संघाच्या विजयात सातत्याने योगदान दिले आहे. श्रीलंकेेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला त्याच्याकडून पुन्हा अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
(Axar Patel attributed his success to captain Hardik Pandya)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
40 वर्षापासून श्रीलंका भारतात फेल! सूर्य खेळीने विजय साकार, भारताच्या यशाचे काही बलाढ्य रेकॉर्ड्स
आयपीएल न खेळता पंत मालामाल! बीसीसीआय मोजणार 21 कोटींची रक्कम