Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल न खेळता पंत मालामाल! बीसीसीआय मोजणार 21 कोटींची रक्कम

आयपीएल न खेळता पंत मालामाल! बीसीसीआय मोजणार 21 कोटींची रक्कम

January 8, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Ricky-Ponting-Rishabh-Pant

Photo Courtesy: iplt20.com


रिषभ पंत याचा मागच्या महिन्यात 30 डिसेंबर रोजी अपघात झाला. अपघातानंतर पंतला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले असून पुढचा मोठा काळ त्याला या अपघातातून बाहेर येण्यासाठी लागणार आहे. पंतच्या गुडघ्याचे लिगामेंट फाटल्यामुळे मुंबईत यावर शस्त्रक्रिया केली गेली. त्याला मैदानात पुनरागमन करण्यासाठी पुढचे किमान सहा महिने लागणार असल्याचे सिंगतले जात आहे. अशात आगामी आयपीएल हंगामासाठी त्याला मिळणाऱ्या 16 कोटी रुपयांवर पाणी फेरले जाणार, असा आनेकांचा समज आहे. मात्र, बीसीसीआयच्या एका नियमामुळे पंतला हे 16 कोटी रुपये मिळू शकतात.

रिषभ पंत (Rishabh Pant) याला लिलावात खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने 16 कोटी रुपये खर्च केले. अशात 2023 हंगामासाठी त्याला संघात रिटेन करण्यासाठी फ्रँचायजीने 16 कोटी रुपये ही किंमत निश्चित केली होती. मात्र अपघातानंतर पंत आगामी आयपीएल हंगामात खेळू शकणार नाहीये. खेळाडू आयपीएल हंगामातील एकही सामना खेळणार नसल्यास त्याला मिळणारी फिस देखील रद्द केल्याचे यापूर्वी आपल्याला पाहायला मिळाले आहे. मात्र पंतचा भारतीय संघासोबत करार असल्यामुळे त्याच्यासाठी नियम वेगळा आहे. पंत आगामी आयपीएल हंगामात एकही सामना खेळला नाही, तरी त्याला 16 कोटी रुपये मिळतील, असे सांगितले जात आहे.

पंत भारतीय संघाचा ग्रेड-ए मध्ये सामील असलेला खेळाडू आहे. या ग्रुपमधील खेलाडूंना बीसीसीआयकडून पाच कोटी रुपये वर्षीक दिले जातात. अशात बीसीसीआय वार्षीक कराराचे पाच कोटी पंतला देणार, पण आयपीएल कराराचे 16 कोटी मिळावे, ही जबाबदारी देखील बोर्डाचीच असेल. पंतल आगामी हंगामात खेळणार नसल्यामुळे फ्रँचायझी त्याला ठरलेली रक्कम देणार नाही. अशात चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की, आयपीएल फ्रँचायझीने द्यायची ती रक्कम बीसीसीआय का देणार? चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर देखील मिळाले आहे. बीसीसीआयने दुखापग्रस्त खेळाडूंना त्यांची आयपीएल मांधन मिळावे यासाठी पुढाकार घेतला असला, तरी बोर्डाच्या तिजोरीवर कसलाही अतिरिक्त भार पडणार नाही.

बीसीसीआयसोबत करार असलेल्या सर्व खेळाडूचा एक विमा बनवलेला असतो. विम्यातील नियमांनुसार एकादा खेळाडू दुखापतीच्या कारणास्तव आयपीएल खेळू शकला नाही, तरी त्याला त्याचे मांधन मिळते. अशात या विमा कंपनीला रिषभ पंतला देखील 16 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. मागच्या वर्षी सीएसकेने वेगवान गोलदंजा दीपक चाहरसाठी 14 कोटी रुपये मोजले आणि चाहर दुखापतीमुळे आयपीएलच्या संपूर्ण हंगामात खेळू शकला नाही. माहितीनुसार विमा कंपनीकडून चाहलाही त्याचे संपूर्ण आयपीएल मांधन दिले गेले होते. पंतला दुखापतीच्या काळात आयपीएलचे 16 तर राष्ट्रीय संघासोबतच्या कराराचे 5, असे एकूण 21 कोटी रुपये मिळतील.

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
AUSvSA: सिडनी कसोटी अनिर्णीत राहिल्याचा भारताला फायदा, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेचे मात्र नुकसान
भावनेच्या भरात चहलकडून हद्दच पार! थेट सूर्यासोबत केले असे काही, डिलीट व्हायच्या आत पाहा व्हिडिओ


Next Post
Indian Cricket Team

40 वर्षापासून श्रीलंका भारतात फेल! सूर्य खेळीने विजय साकार, भारताच्या यशाचे काही बलाढ्य रेकॉर्ड्स

Hardik-Pandya-and-Rohit-Sharma

हार्दिकने धोनी नाही तर, 'या' भारतीय खेळाडूला दिले त्याच्या प्रभावशाली कॅप्टन्सीचे श्रेय

Rohit Pawar

शरद पवारांनंतर आता रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात, एमसीएमध्ये मिळाली महत्वाची जबाबदारी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143