---Advertisement---

पदार्पणात बळींचा पंचक, अखेर ४२ वर्षांनंतर अक्षरने संपवली ही प्रतिक्षा; ठरला दुसराच डावखुरा स्पिनर

On: मंगळवार, फेब्रुवारी 16, 2021 2:59 PM
---Advertisement---

इंग्लंडचे दिग्गज फलंदाज चेन्नई येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले. इंग्लंडच्या फलंदाजांनी पदार्पणवीर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि अनुभवी आर अश्विनच्या भेदक माऱ्यासमोर अक्षरशः लोटांगण घातले. भारताच्या ४८२ धावांच्या आव्हानाचा डोंगर सर करताना इंग्लंडचा संघ अवघ्या १६४ धावांवर गारद झाला अन् ३१३ धावांनी भारताने सामना जिंकला. या दरम्यान अक्षरने एका डावात पाच बळी घेत मोठा विक्रम केला.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सलामीवीर डोमिनिक सिब्ली अक्षरची पहिली शिकार ठरला. अवघ्या ३ धावांवर त्याने सिब्लीला पायचित केले. त्यानंतर रोहित शर्माच्या हातून नाईट वॉचमन जॅक लीचला त्याने शून्यावर झेलबाद केले. पुढे इंग्लंडचा जो रुटला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले. तर ऑली पोप आणि ऑली स्टोनलाही तंबूचा रस्ता दाखवला.

अशाप्रकारे एका डावात इंग्लंडच्या ५ गड्यांना पव्हेलियनला पाठवत अक्षरने पदार्पणात बळींचा पंचक घेण्याचा किर्तीमान केला. विशेष म्हणजे, चेन्नईच्या मैदानावर कसोटी पदार्पणात हा पराक्रम करणारा तो केवळ दुसराच भारतीय डावखुरा फिरकीपटू ठरला आहे. तब्बल ४२ वर्षांआधी म्हणजे १९७९ मध्ये भारतीय दिग्गज दिलीप दोषी यांना हा किर्तीमान केला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईतील सामन्याद्वारे कसोटी पदार्पण करत त्यांनी एका डावात ६ बळी मिळवले होते. यासह चेन्नईच्या मैदानावर कसोटी पदार्पणात बळींचा पंचक नोंदवणारे ते पहिलेच भारतीय डावखुरे फिरकीपटू ठरले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

बिग ब्रेकिंग- तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूला पाठवले मायदेशी

उडा दे गिल्ली..! डॅनियल लॉरेन्सनंतर मोईन अलीची शिकार, पाहा कशी उडवली रिषभ पंतने दांडी

…आणि अश्विनमुळे चेन्नईचे प्रेक्षक भावुक, समालोचकाच्या तमिळ भाषेतील प्रश्नांची अश्विनने दिली तमिळमध्येच उत्तरं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---