भारतीय संघाचा बहुप्रतीक्षित इंग्लंड दौरा आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी आणि त्यानंतर इंग्लंड संघाशी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात आपले पहिलेवहिले विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी आणि इंग्लंडला कसोटी मालिकेत त्यांच्याच देशात पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. यासाठी खेळाडू देखील कसून तयारी करत आहेत.
या तयारीचे फोटो ते आपल्या सोशल मिडीया अकाउंटवरून शेअर करत असतात. मात्र त्यातच विविध गमतीजमती देखील घडत असतात. असाच काहीसा प्रकार भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या बाबतीत घडला. त्याच्या पोस्टवर भारताचाच फिरकीपटू अक्षर पटेलने भन्नाट कमेंट केली. ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अक्षर पटेलने वापरला ‘मिर्झापूर’चा संवाद
त्याचे झाले असे की भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने त्याचा फोटो शेअर केला होता. आणि या फोटोला त्याने ‘रिसेट मोड ऑन’ असे कॅप्शन दिले होते. चाहत्यांनी देखील त्याच्या या फोटोवर भरभरून लाईक्स दिले.
https://www.instagram.com/p/CPdQ9eiHUg9/?utm_source=ig_embed&ig_rid=e09165e6-4d4f-416a-9dad-142ca0cb07d6
मात्र या फोटोवर भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला कमेंट करण्याचा मोह आवरला नाही. त्याने मिर्झापूर वेब सिरीजमधील संवाद वापरत ‘ये भी ठीक है’, अशी कमेंट केली. या कमेंटवर अनेकांना हसू आवरता आले नाही.
बुमराहची भूमिका भारतासाठी महत्वाची
दरम्यान, आगामी इंग्लंड दौर्यावर जसप्रीत बुमराहची भूमिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. इंग्लिश वातावरणात वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थिती असते. त्यामुळे भारतीय संघाला जर पहिल्यावहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकवायचे असेल आणि त्यानंतर इंग्लंडला कसोटी मालिकेत मात द्यायची असेल तर बुमराहची कामगिरी निर्णायक ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
ख्रिस्टियानो रोनाल्डोबाबत कोहलीने गूगलवर सर्च केली होती ही गोष्ट
कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या खेळाडूंत याने मारलेत सर्वाधिक षटकार, दोन भारतीयांचा समावेश
दैदीप्यमान कारकीर्द असूनही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आहे ‘ही’ खंत