आजपासून (५ फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड संघात चेन्नई येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता या सामन्याची सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघात निवड झालेला अष्टपैलू अक्षर पटेल याला पहिल्या कसोटी सामन्यातील अंतिम ११ जणांच्या पथकात संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र दुखापतीमुळे तो सामना खेळण्यापुर्वीच संघातून बाहेर झाला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ट्विटरद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. अक्षरच्या डाव्या पायाच्या गुडघ्यात वेदना होत असल्याने तो इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. अक्षरऐवजी शाहबाज नदिम किंवा राहुल चाहर यांपैकी एकाला संघात संधी दिली जाऊ शकते.
महत्त्वाचे म्हणजे, २७ वर्षीय अक्षरला पहिल्या सामन्याद्वारे भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी होती. परंतु आता दुखापतीमुळे त्याचे कसोटी पदार्पणाचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
JUST IN: Axar Patel has been ruled out of the opening Test versus England due to pain in his left knee.
Shahbaz Nadeem and Rahul Chahar have been added to the squad.#INDvENG
— Cricbuzz (@cricbuzz) February 5, 2021
अक्षर पटेलची क्रिकेट कारकिर्द
अक्षरने मर्यादित षटकांच्या वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. जून २०१४ मध्ये बांग्लादेशविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आजवर त्याने ३८ वनडे सामन्यात ४५ विकेट्स आणि १८१ धावांची कामगिरी केली आहे. तर ११ टी२० सामन्यात ९ विकेट्स आणि ६८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
हॅप्पी बर्थडे भुवी!! भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारबद्दल जाणून घ्या १० खास गोष्टी
सलामीवीर-यष्टीरक्षक ठरले; गोलंदाजीची धुरा ‘या’ खेळाडूंकडे, अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग XI
“डॉक्टरांनी आत बोलावले तेव्हा मी फोनवर शार्दुल आणि सुंदरची भागीदारी पाहात होतो”, विराटने केला खुलासा