चेन्नई येथील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील दुसरा कसोटी सामना आजपासून (१३ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली असून अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला संधी देण्यात आली आहे. यासह अक्षरचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे.
पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी अक्षरला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्याजागी फिरकीपटू शाहबाज नदीमची संघात निवड करण्यात आली होती. परंतु अपेक्षेप्रमाणे तो खास कामगिरी करू शकला नाही. त्याने सामन्यादरम्यान सर्वाधिक नो बॉलही टाकले. अशातच दुसरा कसोटी सामना होण्याआधी अक्षर दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. त्यामुळे नदीमला वगळत अक्षरला संधी देण्यात आली आहे.
यासह अक्षर भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा ३०२ वा खेळाडू ठरला आहे. स्वत: कर्णधार विराट कोहलीने त्याला टेस्ट कॅप देत त्याचे संघात स्वागत केले आहे.
Axar Patel makes his Test debut for India ????
He gets his cap from Virat Kohli.#INDvENG pic.twitter.com/LowHqxx0jx
— ICC (@ICC) February 13, 2021
Welcome to Test cricket, @akshar2026! ????????
Congratulations to the all-rounder who receives his Test cap from #TeamIndia Captain @imVkohli ????????@Paytm #INDvENG pic.twitter.com/WIugeXY15D
— BCCI (@BCCI) February 13, 2021
गोलंदाजी अष्टपैलू अक्षर पटेल याने भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील वनडे आणि टी२० क्रिकेट खेळले आहे. जून २०१४ मध्ये अक्षरने वनडे तर जुलै २०१५ मध्ये टी२० पदार्पण केले. आजवर ३८ वनडे सामन्यात ४५ विकेट्स आणि १८१ धावांची कामगिरी केली आहे. तसेच ११ टी२० सामन्यात ९ विकेट्स आणि ६८ धावा नोंदवल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvENG 2nd Test Live: नाणेफेक जिंकत टीम इंडियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, बुमराहसह ‘हे’ खेळाडू बाहेर
धूल चटा दो अब तो अंग्रेजो को! हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया
तीच गर्दी, तोच आवाज…! प्रेक्षकांच्या आगमनासाठी बीसीसीआय आतुर, शेअर केला भावनिक व्हिडिओ






