आयपीएल 2024 च्या चालू हंगामात दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार रिषभ पंतला स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं. पंत आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडणार आहे. हा सामना 12 मे रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.
या सामन्यात रिषभ पंतच्या अनुपस्थितीत अष्टपैलू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सची धुरा सांभाळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी याची पुष्टी केली. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत पाँटिंग म्हणाला, “उद्याच्या (12 मे) सामन्यात अक्षर पटेल आमचा कर्णधार असेल. तो गेल्या काही हंगामांपासून फ्रँचायझीचा उपकर्णधार होता. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलचा खूप अनुभव आहे. त्याला खेळ चांगला समजतो. तो याबद्दल खूप उत्सुक आहे.”
आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटनं गोलंदाजी केली होती. हा सामना 7 मे 2024 रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळण्यात आला होता. आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत पंतच्या संघाचा हा या हंगामातील तिसरा गुन्हा होता. त्यामुळे रिषभ पंतला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं.
आयपीएलच्या स्लो ओव्हर रेटशी संबंधित आचारसंहितेनुसार, जर एखाद्या संघाच्या कर्णधारानं पहिला गुन्हा केला तर त्याला 12 लाख रुपयांचा दंड आकारला जातो. त्याच आयपीएल हंगामात त्या कर्णधारानं दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचा गुन्हा केल्यास 24 लाख रुपयांचा दंड आकारला जातो. तिसऱ्यांदा चूक झाल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदी आणि 30 लाखांचा दंड ठोठावला जातो.
दिल्ली कॅपिटल्सचे उर्वरित सामने :
12 मे – विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7:30 वा
14 मे – विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, संध्याकाळी 7:30 वा
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग बातमी! दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतचं निलंबन! बीसीसीआयची मोठी कारवाई
‘थाला’ला भेटायला चाहता सरळ मैदानात! ‘माही’च्या पाया पडला अन्….हा व्हायरल व्हिडिओ नक्की पाहाच
“माझं काय आहे, हे तर माझं शेवटचं आहे”, रोहित शर्माचा केकेआरच्या प्रशिक्षकासोबत संभाषणाचा व्हिडिओ लीक