भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना हैदराबाद येथे खेळला गेला. रोमांचक ठरलेल्या या सामन्यात भारतीय संघाने सहा गडी राखून विजय मिळवत मालिका 2-1 अशी आपल्या नावे केली. या मालिकेत भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल याने शानदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला जखडून ठेवले. त्याच्या अप्रतिम गोलंदाजीसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
अक्षरने मालिकेतील या निर्णायक सामन्यात पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व केले. त्याने आपल्या 4 षटकात 33 धावा देत तीन महत्वपूर्ण बळी मिळवले. त्याआधी मोहली येथील पहिल्या सामन्यात त्याने 17 धावा देऊन 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला. नागपूर येथील दुसऱ्या सामन्यात केवळ दोन षटके टाकण्याची संधी मिळालेल्या अक्षरने पावर प्लेमध्ये 2 षटकात 13 धावा देत मॅक्सवेल व टीम डेव्हिड या आक्रमक फलंदाजांना बाद केलेले. अक्षरने संपूर्ण मालिकेत 8 फलंदाजांना माघारी पाठवत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. वेळप्रसंगी आक्रमक फलंदाजी व एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा त्याच्या आणखी जमेच्या बाजू त्याला भारतीय संघाचा एक प्रमुख सदस्य बनवत आहेत.
भारताचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा हा दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याचा पर्याय म्हणून अक्षर पटेलकडे पाहिले जातेय. त्याला संघात देखील संधी मिळाली आहे. अक्षरने मागील काही मालिकांपासून भारताच्या प्रमुख संघात जागा बनवलीये. वेस्ट इंडीज व झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याने उल्लेखनीय खेळ दाखवलेला. जडेजाच्या अनुपस्थितीत आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका आणि विश्वचषकात भारतीय संघाला त्याच्याकडून अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
निर्णायक सामन्यात नाणेफेक भारताच्या बाजूने! प्रथम गोलंदाजीचा निर्णय; भुवनेश्वरचे पुनरागमन
देशांतर्गत क्रिकेटबद्दल ‘चॅम्पियन’ कर्णधार रहाणेचे लक्षवेधी विधान; म्हणाला…