पुणे, 7 ऑक्टोबर 2023: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन ओम दळवी मेमोरियल टेनिस स्कूल ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेत आयुष वर्मा, विवान मल्होत्रा, रोहन बोर्डे यांनी आगेकूच केली.
महाराष्ट्र पोलीस टेनिस जिमखाना येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत आयुष वर्मा, विवान मल्होत्रा, रोहन बोर्डे, आयुष चिंतामणी,अनिश वडनेरकर, चिन्मय मेहता, आयुष मिश्रा, आरव बेले, मिहित पवार यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव केला. स्पर्धेचे उद्घाटन पिंपळे सौदागरचे नगरसेवक शत्रूघन काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक उमेश दळवी, मारुती राउत रेशम रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. (Ayush, Vivaan, Rohan Advance in PMDTA Ranking Om Dalvi Memorial Tennis School Bronze Series 2023 Tournament)
स्पर्धेचा सविस्तर निकाल:पहिली फेरी: 12 वर्षांखालील मुले:
अधिराज दुधाणे(1) वि.वि.विहान सावंत 6-1;
वैदिक बन्सल वि.वि.सात्विक चव्हाण 6-1;
पलाश जैन वि.वि. शर्विल गंगाखेडकर 6-4;
वेद परदेशी(15) वि.वि.आरुष यादव 6-0;
आयुष मिश्रा (11) वि.वि.मल्हार जोशी 6-5(5);
लव परदेशी(8) वि.वि.साईराज बाबर 6-0;
विराज कुलकर्णी वि.वि.शिवेन मिश्रा 6-4;
14 वर्षांखालील मुले: दुसरी फेरी:
आयुष वर्मा वि.वि.अवलोव वर्मा 6-2;
विवान मल्होत्रा वि.वि.विआन पेंडुरकर 6-0;
रोहन बोर्डे(15) वि.वि.अर्जुन पाटोळे 6-0;
आयुष चिंतामणी वि.वि.सिद्धार्थ अचलेरकर 6-2;
अनिश वडनेरकर(13) वि.वि.अबीर सिद्धू 6-1;
चिन्मय मेहता वि.वि.अरिन कोटणीस 6-3;
आयुष मिश्रा वि.वि.रुशील सुरनीस 6-0;
आरव बेले वि.वि.साहिल बगाडे 6-0;
मिहित पवार वि.वि.आदित्य शहा 6-0;
महत्वाच्या बातम्या –
एकाच षटकात फुटला आफ्रिकी गोलंदाजांना घाम, पाहा मेंडिसने मारलेले तीन निर्दयी षटकार
फक्त 300 चेंडूत दक्षिण आफ्रिकेने लावली विक्रमांची रास! एका क्लिकवर वाचा सर्व रेकॉर्ड