---Advertisement---

फक्त 300 चेंडूत दक्षिण आफ्रिकेने लावली विक्रमांची रास! एका क्लिकवर वाचा सर्व रेकॉर्ड

On: शनिवार, ऑक्टोबर 7, 2023 8:42 PM
---Advertisement---

शनिवारी (7 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळला गेला. विश्वचषक 2023 मधील हा चौथा सामना असून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने होते. क्विंटन डी कॉक, रासी वॅन डर डसेन  आणि ऐडन मार्करम यांच्या शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने 428 धावा केल्या. यासह त्यांनी वनडे क्रिकेट विश्वचषकातील अनेक विक्रम आपल्या नावे केले.

दक्षिण आफ्रिकेसाठी या सामन्यात सलामीला आलेल्या क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याने 84 चेंडूत 100 धावा केल्या. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रासी वॅन डर डसेन (Rassie van der Dussen ) याने 110 चेंडूत 108 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच मार्करम (Aiden Markram) याने अवघ्या 54 चेंडूत 106 धावा फटकावल्या. शेवटच्या षटकांमध्ये डेव्हिड मिलर (David Miller) याने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. अवघ्या 21 चेंडूत 39 धावा करून मिलरने फिनिशरची भूमिका पुन्हा एकदा चोख पार पाडली. यासह दक्षिण आफ्रिकेने 5 बाद 428 धावा चोपल्या.

ही वनडे विश्वचषकाच्या 48 वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. त्यांनी 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने उभारलेल्या 417 धावांचा विक्रम मोडीत काढला. यासोबतच एका विश्वचषकाच्या सामन्यात तीन शतके झळकावणारा पहिला संघदेखील दक्षिण आफ्रिका बनला. तर मार्करम याने विश्वचषक इतिहासातील सर्वात वेगवान शतक पूर्ण केले. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील देखील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली.

यास दक्षिण आफ्रिकेच्या डावात तब्बल 45 चौकार आणि 14 षटकार ठोकले गेले. विश्वचषक 2023 मधील ही सर्वाधिक संख्या आहे.

(South Africa Batters Post Many Records Against Srilanka In ODI World Cup)

महत्वाच्या बातम्या – 
हॅंगझूमध्ये भारतीय पथकाची ऐतिहासिक कामगिरी! तब्बल 107 पदकांसह चौथ्या स्थानी संपवले अभियान
कशी चाललीय टीम इंडियाची तयारी अन् शुबमनच्या फिटनेसचं काय? रोहित स्पष्टच बोलला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---