---Advertisement---

जिद्द असावी तर अशी! पाकिस्तान टी२० संघात वजनदार फलंदाजाची एंट्री, वर्षभरात घटवलं ३० किलो वजन

On: शनिवार, जून 5, 2021 4:03 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी कर्णधार मोईन खानचा मुलगा आणि धडाकेबाज फलंदाज आझम खान याची देशांतर्गत क्रिकेटमधील उत्तम कामगिरीनंतर शुक्रवारी (४ जून) इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी पाकिस्तान संघात निवड झाली. विशेष म्हणजे संघात स्थान मिळवण्यासाठी त्याने ३० किलो वजन कमी केले आहे. २२ वर्षीय आझम गेल्या एक वर्षापासून निवडकर्त्यांच्या रडारवर होता. परंतु, निवड करण्यापूर्वी त्याला सुमारे ३० किलो वजन कमी करण्यास सांगितले होते.

आझमने असा दावा केला आहे की, गेल्या १२ महिन्यांत मी जवळपास ३० किलो वजन कमी केले आहे. पाकिस्तान सुपर लीगसह ३६ देशांतर्गत टी२० सामन्यांमध्ये त्याने १५७ च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या आहेत. तसेच, तो पाकिस्तान सुपर लीग आणि श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये खेळला आहे.

या खेळाडूंनी केले पुनरागमन
निवड समितीने इमाद वसिमला इंग्लंडमधील तीन टी२० आणि वेस्ट इंडीजमधील पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी हरीस सोहेलसह इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी पुन्हा संधी दिली आहे. जमैका येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास आणि नसीम शाहही संघात परतले आहेत. झिम्बाब्वे विरुद्ध नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी अब्बास व नसीमला विश्रांती दिली होती.

निवड समितीने अनुभवी लेगस्पिनर यासिर शहा यालाही कसोटी संघात स्थान दिले आहे. परंतु, त्याची अंतिम निवड तंदुरुस्ती चाचणीवर आधारित असेल. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो झिम्बाब्वे दौर्‍याला मुकला होता. पाकिस्तान संघ ८ ते २० जुलै दरम्यान इंग्लंड दौर्‍यावर तीन सामन्यांची वनडे मालिका आणि तितक्याच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.

टी२० मालिकांसाठी पाकिस्तान संघ-
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अर्शद इक्बाल, फहीम अशरफ, फखर जमान, हैदर अली, हरीस रऊफ, हसन अली, इमाद वसिम, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), शाहीन शाह आफ्रिदी, शर्जील खान, उस्मान कादिर व आझम खान.

महत्त्वाच्या बातम्या-

एकाचं पोट दुखलं, दुसऱ्याची गोलंदाजी नडली; क्रिकेट इतिहासातील एकमेव षटक, ज्यात तिघांनी केली गोलंदाजी

‘रोहित भाई आला आणि त्याने मला…,’ सिराजने केली तक्रार; पाहा विमान प्रवासातील तो प्रसंग

‘मी कर्णधारपदापासून दूरच बरा’, राशिद खानने सांगितले नेतृत्वपद नाकारण्याचे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---