पुणे: ‘सदू शिंदे सिनियर मेन्स क्रिकेट २०१८’ स्पर्धेत ‘आझम स्पोर्ट्स अकॅडमी’ला जेते पद मिळाले. ‘आझम स्पोर्ट्स अकॅडमी’ ने ‘ओम क्रिकेट अकॅडमी’ चा ६ गडी राखून पराभव केला.
‘द पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन’ च्या वतीने घेण्यात आलेली ही स्पर्धा आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी आझम कॅम्पस मैदानावर झाली.
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ चे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार, सचिव लतीफ मगदूम, ‘आझम स्पोर्ट्स अकॅडमी’चे संचालक गुलजार शेख यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
आदिल अन्सारी याने ५४ चेंडूत १०० धावा करून सामन्याचा मानकरी ठरला.