---Advertisement---

अमित पंघलच्या ‘पावरफुल’ पंचने मिळाले भारताला १५ वे सुवर्ण

Amit Panghal
---Advertisement---

भारताचा स्टार बॉक्सर अमित पंघलने २०२२ च्या बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या बॉक्सरवर ताकदवर पंचेसचा पाऊस पाडत, चार वर्षानंतर आपल्या पदकाचा रंग बदलला. २०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत  रौप्यपदकावर समाधान मानणाऱ्या पंघलने अखेर यावेळी ५१ किलो वजनी गटातील सुवर्ण जिंकले. पंघलचे हे पदक भारताचे स्पर्धेतील १५ वे सुवर्ण आहे. अंतिम फेरीत त्याने इंग्लिश बॉक्सर मॅकडोनाल्डला अक्षरशा निष्प्रभ केले.

तिन्ही फेऱ्यांमध्ये पंघलने इंग्लिश बॉक्सरला पुनरागमनाची संधी दिली नाही आणि त्याच्यावर दबाव कायम ठेवला. त्याने इंग्लिश बॉक्सरवर इतके वर्चस्व गाजवले की पहिल्या फेरीत पाचही रेफ्रींनी पंघलला १०-१० गुण दिले. दुस-या फेरीत, पंघलने ५ पैकी ४ रेफ्रींकडून १० गुण मिळवले. तिसर्‍या फेरीतही पंघलला ४ रेफ्रींनी गुण दिले आणि अशा प्रकारे भारतीय बॉक्सरने ५-० अशी आघाडी घेत सुवर्णपदक आपल्या नावे केले.

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---