---Advertisement---

‘बाप-बाप होता है…’, सुपरस्टार शाहरुखच्या ट्वीटवर सेहवागचे भन्नाट उत्तर; सर्वत्र रंगलीय चर्चा

On: शनिवार, सप्टेंबर 23, 2023 11:09 AM
Virender-Sehwag-And-Shahrukh-Khan
---Advertisement---

जगातील विस्फोटक फलंदाजांमध्ये गणला जाणारा खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा माजी दिग्गज वीरेंद्र सेहवाग होय. समोर गोलंदाज कुठलाही असो पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करायचा. अर्धशतक, शतक किंवा द्विशतक करण्यासाठी थोड्या धावा शिल्लक असायच्या, तेव्हाही हा पठ्ठ्या षटकार आणि चौकार मारून पराक्रम गाजवायचा. सेहवाग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरीही तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी जोडला राहतो. तो त्याच्या मजेशीर पोस्ट आणि ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

काय आहे किस्सा?
खरं तर, बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) हा सध्या त्याच्या ‘जवान’ (Jawan) सिनेमाच्या यशामुळे सर्वत्र चर्चेत आहे. हा सिनेमा दरदिवशी बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. अशातच शाहरुखने त्याच्या चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी आस्क एसआरके (Asksrk) सेशन आयोजित केले होते. यातून त्याने चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एकाने शाहरुखला विचारले की, “अबरामने जवान सिनेमा पाहिल्यानंतर काय म्हटले?”

यावर शाहरुखने उत्तर देत लिहिले की, “बाप-बाप होता है. नाही-नाही फक्त मजा करत आहे. त्याला व्हिलनसोबतचा माझा फायटिंग सीन खूप आवडला होता आणि सिनेमाचा क्लायमॅक्सही चांगला वाटला.”

सेहवागला शाहरुखचा ‘बाप-बाप होता है’ (Baap Baap Hota Hai) हे वाक्य फारच आवडले आणि त्याने ट्वीट रिट्विट करत लिहिले की, “नक्कीच, मग ते क्रिकेटचे मैदान असो किंवा सिनेमा बाप-बाप होता है.”

विशेष म्हणजे, सेहवागने असे कोणत्या संदर्भात म्हटले आहे, हे सांगणे कठीण आहे. मात्र, त्याच्या ट्वीटमुळे पाकिस्तानी चाहते निराश झाले आहेत. खरं तर, शाहरुखचा सिनेमा रिलीज होऊन आता 15 दिवस उलटले आहेत. सिनेमाने जगभरात आतापर्यंत 937 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दुसरीकडे, भारतीय क्रिकेटविषयी बोलायचं झालं, तर सध्या ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत पार पडला, जो भारताने 5 विकेट्सने आपल्या खिशात घातला. यासह भारताने मालिकेत 1-0ने आघाडीही घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी (दि. 24 सप्टेंबर) इंदोरच्या होळकर स्टेडिअमवर पार पडणार आहे. (baap Baap hota hai phir chahe cricketer virender sehwag gave a funny reaction to superstar shahrukh khan tweet)

हेही वाचा-
वॉर्नरचे धक्कादायक कृत्य! हातमिळवणी करायला गेलेल्या जडेजावर उगारला हात, फॅन्सच्या तळपायाची आग मस्तकात- Video
भारताविरुद्ध पराभूत होऊनही ऑसी कर्णधाराला पराकोटीचा आनंद! स्पष्टच म्हणाला, ‘मी पर्सनली खुश आहे…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---