कपिल देव, जवागल श्रीनाथ आणि जहीर खान जेव्हा खेळत होते, तेव्हा त्यांनी भारतीय गोलंदाजीची एकहाती धुरा वाहिली आहे.
आज भारतीय संघाकडे आता ८ ते ९ असे वेगवान गोलंदाज आहेत, जे भारतीय संघाला कसोटीत विजय मिळवून देऊ शकतात. असे मत भारताचा अनुभवी गोलंदाज इंशात शर्माने मांडले आहे.
“सर्वजन म्हणतात की भारतात चांगले वेगवान गोलंदाज घडत नाहीत. मात्र आज भारतीय संघाकडे ८-९ असे वेगवान गोलंदाज आहेत जे कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करु शकतात. आमच्याकडे गोलंदाजांची अशी फळी आहे, जी आम्हाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून देऊ शकते.” आपल्या सहकारी गोलंदाजांचे कौतुक करताना इशांत म्हणाला.
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात सर्वात जास्त ८२ कसोटी सामने खेळलेला इशांत एकमेव गोलंदाज आहे. भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व इशांतलाच सांभाळावे लागणार आहे.
त्याच बरोबर इशांतने त्याच्या स्वत:च्या गोलंदाजीतही सुधारणा केली आहे असे म्हणाला.
“मी आता मझ्या गोलंदाजीत खूप सुधारणा आणि बदल केले आहेत. आधी मी फक्त जशी होईल तशी गोलंदाजी करायचो. मात्र आता परिस्थिती ओळखून समोरच्या फलंदाजानुसार गोलंदाजी करत आहे.” असे इशांत म्हणाला.
२०१४ च्या कसोटी मालिकेत भारताला इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स वरील एकमेव सामना जिंकता आला होता. या विजयामध्ये इशांत शर्माचा सिंहाचा वाटा होता.
या सामन्याच्या दुसऱ्या डावात इशांतने ७४ धावात ७ बळी मिळवले होते.
भारातच्या इंग्लंड विरुद्धच्या कोसोटी मालिकेला १ ऑगस्टपासून सुरवात होणार आहे.