---Advertisement---

विरेंद्र सेहवागने दिला टीम इंडियाला आधार, ट्विट करुन जिंकली करोडो चाहत्यांची मने

On: बुधवार, जुलै 18, 2018 1:06 PM
---Advertisement---

मगंळवारी (17 जुलै) लिड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर इंग्लंडने भारतावर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयाबरोबर इंग्लंडने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

मात्र भारताच्या या पराभवानंतर माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने टीम इंडियाला प्रोत्साहन देत एक ट्विट केले. सेहवागने या ट्विटने असंख्य भारतीय क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली.

“जीत बेशक होठों पर मुस्कुराहट लाती है, लेकिन हार ही जिंदगी का एक नया सबक सिखाती है. मला खात्री आहे की भारतीय संघ  लवकरच या पराभवानंतर आपल्या चुकांमध्ये सुधारणा करुन उर्वरीत इंग्लंड दौऱ्यात जोरदार पुनरागमन करेल.” या शब्दात सेहवागने भारतीय संघावर विश्वास व्यक्त करत प्रोत्साहित केले.

https://twitter.com/virendersehwag/status/1019297174692098048

ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर भारताच्या माजी क्रिकेटपटूंपैकी सर्वात जास्त अॅक्टीव असणारा सेहवाग त्याच्या हटके आणि गमतीदार ट्विटसाठी प्रसिद्ध आहे.

या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या अणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने 50 षटकात 8 बाद 256 धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार विराट कोहलीच्या  71 धावा वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

भारताच्या 256 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 44.3 षटकात 2 गडी गमावून या सामन्यासह मालिका जिंकली. इंग्लडच्या या विजयात जो रुट नाबाद 100 आणि कर्णधार इयोन मॉर्गनने 88 धावांचे योगदान दिले.

महत्त्वाच्या बातम्या-

-तब्बल नऊ एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघावर आली ही वेळ

-मायदेशात इंग्लंडने रचला इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment