---Advertisement---

संपूर्ण वर्षात बाबर-रिझवानचा धूमाकूळ; शतकी भागीदारीसह बनविला विश्वविक्रम

On: मंगळवार, नोव्हेंबर 2, 2021 11:06 PM
babar-rizwan
---Advertisement---

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात मंगळवारी (२ नोव्हेंबर) दुसऱ्या सामन्यात ब गटातील पाकिस्तान आणि नामिबिया हे संघ आमने-सामने आले. अबुधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने नामिबियाचा पराभव केला. यासह पाकिस्तान संघाने सलग चौथ्या विजयासह उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली. पाकिस्तानच्या विजयची पायाभरणी करणाऱ्या कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी शानदार सलामी देत एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

बाबर व रिझवानची शानदार भागीदारी
या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सावध सुरुवातीनंतर सलामीवीर बाबर व मोहम्मद रिझवानने संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. दोघांनीही १४.२ षटकात ११३ धावांची अप्रतिम खेळी केली. बाबरने ४९ चेंडूत ७० तर रिझवानने ५० चेंडूवर नाबाद ७९ धावांची खेळी केली.

एका वर्षात सर्वाधिक धावा बनवणारी जोडी
या शतकी सलामीसह बाबर रिझवान जोडीने २०२१ या कॅलेंडर वर्षात एकत्रितरित्या १०४१ धावा जोडल्या. यापूर्वी ही कामगिरी आयर्लंडच्या नील ओब्रायन व पॉल स्टर्लिंग या जोडीच्या नावावर होती. त्यांनी २०१९ मध्ये एकत्रितपणे ७५६ धावा केलेल्या. नेदरलँड्सच्या बेन कूपर व ओ’डोड यांनी २०१९ मध्ये ६६२, स्कॉटलंडच्या कायले कोएत्झर व मन्सी यांनी त्याचवर्षी ६५८ धावा एकत्रितपणे जमविल्या होत्या. या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर ६२१ धावांसह भारताचे रोहित शर्मा व शिखर धवन हे आहेत. त्यांनी २०१८ साली टी२० क्रिकेटमध्ये ही कामगिरी करून दाखवलेली.

महत्त्वाच्या बातम्या-

गांगुली पुन्हा गोत्यात! गमवावे लागणार बीसीसीआय अध्यक्षपद?

टी२० विश्वचषकादरम्यान दिग्गज पंचांनी बायोबबलचे केले उल्लंघन, आयसीसीने केली ‘मोठी’ कारवाई

“भारतीय संघामध्ये दोन गट आहेत. एक कोहलीसोबत, तर दुसरा त्याच्या विरोधात”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---