जानेवारी २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. त्यानुसार आता एप्रिल महिन्यातील या पुरस्काराच्या विजेत्या खेळाडूंची नावे आयसीसीने जाहीर केली आहेत. या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू बाबर आझमला जाहीर झाला आहे. तर सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या ऐलिसा हेलीला जाहीर झाला आहे.
बाबर आझमने या खेळाडूंना टाकले मागे
एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेपटूच्या पुरस्कारासाठी पुरुष गटात पाकिस्तानच्या बाबर आझम, फखर जमान आणि नेपाळच्या कुशल भुर्तेल यांना नामांकन मिळाले होते. त्यामुळे बाबर आझमने फखर जमान आणि कुशल भुर्तेलला मागे टाकत आयसीसीचा हा पुरस्कार जिंकला आहे.
अशी होती बाबर आझमची एप्रिल महिन्यातील कामगिरी
बाबर आझम सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे सामने खेळले. यात त्याने २२८ धावा केल्या. तसेच यात त्याच्या १०३ आणि ९४ धावांच्या खेळीचा समावेश होता. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने वनडे क्रमवारीत विराट कोहलीला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला होता. याबरोबरच त्याने दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे विरुद्ध मिळून ७ टी२० सामने खेळले. यात त्याने ४३.७५ च्या सरासरीने ३०५ धावा केल्या. याबरोबरच तो मोहम्मद रिझवान बरोबर केलेल्या १९७ धावांच्या भागीदारीचा भाग होता.
🔸 Three ODIs, 228 runs at 76.00
🔸 Seven T20Is, 305 runs at 43.57
🔥 Became the No.1 ODI batsmanWell done, @babarazam258 for winning the ICC Men's Player of the Month for April 👏#ICCPOTM pic.twitter.com/CuCaodFEk7
— ICC (@ICC) May 10, 2021
एलिसा हेलीने मिळवला पुरस्कार
महिला गटात एलिसा हेलीने ऑस्ट्रेलियाच्यात मेगन शट आणि न्यूझीलंडच्या लेह कास्पेरेक या क्रिकेटपटूंना मागे टाकत एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला आहे. एप्रिलमध्ये हेलीने न्यूझीलंडविरुद्ध ३ वनडे सामने खेळले. यात त्याने ५१.६६ च्या सरासरीने १५५ धावा केल्या आहेत.
🔸 Three ODIs, 155 runs at 51.66
🔥 Leading run-scorer in Australia’s record-breaking ODI series win over New ZealandCongratulations, @ahealy77 for becoming the ICC Women’s Player of the Month for April 🎉#ICCPOTM pic.twitter.com/BX0fKScm2o
— ICC (@ICC) May 10, 2021
अशा पद्धतीने दिले जातात पुरस्कार
या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येते. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येते.
आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतात.
व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करते. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतात. पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांना 90 टक्के तर चाहत्यांच्या मतांना 10 टक्के प्राधान्य असते. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
पॅट कमिन्सने नजरचुकीने मयंती लँगरऐवजी केले मयंक अगरवालला केले टॅग, मग मिळाला ‘असा’ रिप्लाय
मास्टरप्लॅन! ‘कर्णधार’ रिषभ पंतने एमएस धोनीला बाद करण्यासाठी आवेश खानला केली ‘अशाप्रकारे’ मदत