टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची बॅट खूपच शांत होती. बाबरला त्याच्या फलंदाजी कामगिरीवरून ट्रोल केले जात होते. मात्र, या स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बाबरला सूर गवसला. त्याने आणि त्याचा संघसहकारी सलामीवीर मोहम्मद रिझवान याने शतकी भागीदारी रचली. यामुळे त्यांच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. चला तर तो खास विक्रम काय आहे, जाणून घेऊया…
बुधवारी (दि. 09 नोव्हेंबर) सिडनी येथे न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (New Zealand vs Pakistan) संघात टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयात पाकिस्तानचे सलामीवीर भलतेच चमकले. बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Moahmmad Rizwan) या सलामीवीरांनी शतकी भागीदारी रचली. 105 धावांच्या या भागीदारीत बाबरने 53 आणि रिझवानने 48 धावांचे योगदान दिले होते. यासह त्यांनी टी20 विश्वचषकात सर्वाधिक शतकी भागीदारी रचण्याची कामगिरी केली.
First pair to record three ???? stands in T20 World Cups ????????#WeHaveWeWill | #T20WorldCup | #NZvPAK pic.twitter.com/LkDruwWzaO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 9, 2022
टी20 विश्वचषकात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी आतापर्यंत 3 शतकी भागीदारी रचल्या आहेत. या यादीत हे या फलंदाजांची जोडी अव्वलस्थानी आहे. या यादीत आणखी पाच जोड्या आहेत. मात्र, या पाचही जोड्या संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहेत. यामध्ये ऍडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन, ऍलेक्स हेल्स आणि ऑयन मॉर्गन, माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा, विराट कोहली आणि रोहित शर्मा, डेविड वॉर्नर आणि जेम्स वॉटसन यांचा समावेश आहे.
टी20 विश्वचषकात सर्वाधिक शतकी भागीदारी रचणाऱ्या जोड्या
3 वेळा- बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान*
2 वेळा- ऍडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन
2 वेळा- ऍलेक्स हेल्स आणि ऑयन मॉर्गन
2 वेळा- माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा
2 वेळा- विराट कोहली आणि रोहित शर्मा
2 वेळा- डेविड वॉर्नर आणि जेम्स वॉटसन
सामन्याचा आढावा
न्यूझीलंड संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 152 धावा चोपल्या होत्या. न्यूझीलंडचे 153 धावांचे आव्हान पाकिस्तानने 19.1 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केले आणि हा सामना 7 विकेट्सने आपल्या नावावर केला. तसेच, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एन्ट्री केली. (Babar Azam and Mohammad Rizwan now have the most century partnerships in T20 World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! पंचांनी एकाच फलंदाजाला 2 चेंडूंवर दोन वेळा दिले आऊट, पण असं घडलं तरी कसं?
पाकिस्तान फायनलमध्ये! न्यूझीलंडच्या विश्वविजयाच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा





