भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या रोमहर्षक लढतीत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने या सामन्यात ५ विकेट्स राखत विजय मिळवला. त्यानंतर पाकिस्तानी संघाला मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम याने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्याने पाकिस्तानी संघाचे तोंडभरून कौतुक केले. शिवाय हार्दिक पंड्याला देखील विशेष खेळीसाठी शुभेच्छा दिल्या.
बाबर म्हणाला की, “आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली (बॉलने), ती विलक्षण होती. आम्ही 10-15 धावांनी कमी होतो. या सामन्यात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. रौफ आणि डहानी या दोघांनीही चेंडूवर चांगला खेळ केला आणि त्यांच्या धावा आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. शेवटच्या षटकात 15 धावा झाल्या असत्या तरी नवाजने बचाव केला असता.”
हार्दिक पांड्याबद्दल बाबर आझम म्हणाला की, “दबाव निर्माण करण्याचा विचार होता पण हार्दिकने चांगली कामगिरी केली.” शेवटी नसीमबद्दल बोलताना तो म्हणाला की, “नसीम हा तरुण गोलंदाज आहे. त्याने चांगली गोलंदाजी केली, आक्रमकता दाखवली आणि शाहीनची अनुपस्थिती काही प्रमाणात जाणवू दिली नाही.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: ‘भारत-पाकिस्तान सामन्यामुळे वैरीही बनले मित्र!’ जडेजा-माजरेंकरांचा झाला आमना सामना
कोहलीने 100व्या टी20त केलाय भीमपराक्रम! धावांच्या त्या यादीत रोहितच्या स्पर्धकालाच टाकलं मागे
हार्ड हिटिंग पंड्या! धोनी स्टाईल मॅच फिनिश करणाऱ्या हार्दिकला कार्तिकचा खाली झुकून ‘मुजरा’