पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात रविवारी (11 सप्टेंबर) आशिया चषक 2022 चा अंतिम सामना रंगणार आहे. दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. श्रीलंकेची नजर हा सामना जिंकत सहाव्यांदा आशिया चषक जिंकण्यावर असेल. तर पाकिस्तानचा संघ तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. मात्र पाकिस्तान संघासाठी त्यांचा कर्णधार बाबर आझम याचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांनी आझमच्या फॉर्मबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर असलेला आझम (Babar Azam) आशिया चषकात (Asia Cup 2022) आतापर्यंत 100 धावाही करू शकलेला नाही. त्याची यंदाच्या आशिया चषकातील सर्वोच्च वैयक्तिक खेळी 30 धावा इतकी राहिली आहे. श्रीलंकेविरुद्धच त्याने या धावा केल्या होत्या. आझमने आतापर्यंत आशिया चषकातील 5 सामन्यांमध्ये फक्त 63 धावा केल्या आहेत.
आझमच्या या खराब फॉर्मबद्दल बोलताना मुश्ताक (Saqlain Mushtaq) म्हणाले की, “आझम सध्या चांगल्या फॉर्मात आहे. परंतु त्याला नशिबाची साथ मिळत नाहीये. मुश्ताक यांनी आझमचा बचाव करताना म्हटले की, आझम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण त्याचे नशीबच त्याच्यासोबत नाहीये. त्याने भारताविरुद्धच्या सामन्यात ज्याप्रकारे बाउंड्री मारली होती, ती पाहण्यासारखी होती.”
अंतिम सामन्याबद्दल काय म्हणाले मुश्ताक?
याबरोबरच मुश्ताक यांनी पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात चांगले प्रदर्शन करेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. याबरोबरच संघाला नाणेफेकीवर अवलंबून न राहण्याचाही सल्ला दिला आहे.
अंतिम सामन्यापूर्वी सुपर-4 फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानचे फलंदाज सपशेल फेल ठरले होते. त्यांना पूर्ण डावात फक्त 121 धावा करता आल्या होत्या. याबद्दल बोलताना मुश्ताक म्हणाले की, “आमच्या फलंदाजांनी भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध चांगले प्रदर्शन केले होते. तुम्ही विचार करत असाल की, ही धावसंख्या कमी होती आणि नसीम शाहने आम्हाला हे सामने जिंकून दिले. परंतु आमच्या सर्वच्या सर्व 11 खेळाडूंनी फलंदाजी केली. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही अंतिम सामन्यात चांगले प्रदर्शन करू. श्रीलंकानेही चांगला खेळ दाखवला आणि सामना जिंकला.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटचा वनडे सामना खेळणाऱ्या फिंचवर साउदीने नाही दाखवली दया, पाहा कसा उडवला त्रिफळा
‘टी20 विश्वचषकात दीपक चाहर अन् अर्शदीपला संधी मिळणार!’ भारतीय दिग्गजाने केलाय दावा
‘पंत की कार्तिक’ टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळावे?