पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात रविवारी (11 सप्टेंबर) आशिया चषक 2022 चा अंतिम सामना रंगणार आहे. दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. श्रीलंकेची नजर हा सामना जिंकत सहाव्यांदा आशिया चषक जिंकण्यावर असेल. तर पाकिस्तानचा संघ तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
अंतिम सामन्यापूर्वी (Asia Cup 2022 Final) सुपर-4 फेरीतही हे संघ भिडले होते. हा सामना दुबईच्याच मैदानावर झाला होता, ज्यामध्ये श्रीलंकेने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. यानंतर आता महत्त्वपूर्ण अशा अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ त्यांचे सर्वोत्कृष्ट 11 खेळाडू मैदानावर उतरतील. अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन (Predicted Playing Xi) कशी असेल?, यावर नजर टाकूया..
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने श्रीलंकाविरुद्धच्या मागील सामन्यात शादाब खान आणि नसीम शाह या धाकड गोलंदाजांना विश्रांती देत हसन अली आणि उस्मान कादिर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले होते. परंतु आता अंतिम सामन्यात आझम या दोन्ही खेळाडूंना पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करू शकतो. नसीम शाह आणि शादाब खान यांचे आशिया चषकातील आतापर्यंतचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. शादाबने 4 सामन्यात 7 तर नसीमने 4 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच दुखापतीतून बरा झालेल्या शाहनवाज दहानी यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करण्याचा विचार आझम करू शकतो.
दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाने आशिया चषकात आतापर्यंत त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वात कमी बदल केले आहेत. अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ त्याच प्लेइंग इलेव्हनसह उतरू शकतो, जो त्यांनी भारताविरुद्ध खेळवला होता.
पाकिस्तान संभाव्य प्लेइंग इलेव्हन:मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, आसिफ अली, खुशदिल शाह, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन
श्रीलंका संभाव्य प्लेइंग इलेव्हन:पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), चरिथ अस्लांका, दनुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, माहिश थिक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मधुशंका
महत्त्वाच्या बातम्या-
स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
लहानपणीचा खादाड विराट! शतक ठोकल्यानंतर शेअर केलाय जुना सुंदर फोटो
दुलीप ट्रॉफीमध्ये भारताच्या युवा फलंदाजाला ‘यश’! झंझावाती 193 धावांच्या जोरावर सावरला डाव