---Advertisement---

‘या’ टी20 लीगमध्ये 50 लाखांत खेळणार बाबर! आयपीएलचा नवा स्टारही झाला संघ सहकारी

On: मंगळवार, मे 23, 2023 10:18 PM
babar-azam
---Advertisement---

श्रीलंकेत आयोजित होणाऱ्या लंका प्रीमियर लीगचा चौथा हंगाम काही दिवसांत सुरू होत आहे. या हंगामात कोलंबो स्ट्रायकर्स नावाचा नवा संघ सहभागी होईल. या संघाने नुकतीचआपल्या आयकॉन खेळाडूंची घोषणा केली‌‌. वर्तमान क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची निवड कोलंबो स्ट्रायकर्सने केली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली ‌

बाबरशिवाय पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहही या संघाचा भाग असेल. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने प्रभावित करणाऱ्या मथिशा पाथिराना व श्रीलंकेचा प्रमुख अष्टपैलू चमिका करुणारत्ने यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.

एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, प्री-ड्राफ्ट अर्थात ड्राफ्टपूर्वी खरेदी केलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय रुबी श्रेणीमध्ये ठेवल्यास त्यांना 60,000 अमेरिकन डॉलर मिळतात. हा नियम कायम राहिल्यास बाबरलाही तीच किंमत मिळेल. ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये बदलल्यास बाबरला , अंदाजे 50 लाख रुपये मिळतील.

इंटरनॅशनल रुबी ही या लीगमधील खेळाडूंची सर्वोच्च श्रेणी आहे. यासोबतच कोलंबो स्ट्रायकर्स संघ बाबरला आपला कर्णधार देखील बनवू शकतो. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात बाबरच्याच नेतृत्वात पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, तो आपल्या संघाला विजेतेपद मिळवू शकला नाही .बाबरच्या नेतृत्वाखाली पेशावर झल्मीला पाकिस्तान सुपर लीगचे विजेतेपदही जिंकता आले नाही. बाबरची टी20 क्रिकेटमधील आकडेवारी पाहिल्यास त्याने 260 टी20 सामन्यांमध्ये 9201 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने नऊ शतके आणि 76 अर्धशतके साजरी केली आहेत.

(Babar Azam Become Icon Player In Lanka Premier League For Colombo Strikers Matheesha Pathirana Also There)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BIG BREAKING: वेस्ट इंडिजचा बडा क्रिकेटपटू फिक्सिंग प्रकरणात निलंबित, क्रिकेटविश्वात खळबळ
एक-दोन नाही हंगामातील 10 सामन्यात धोनीने दाखवलं धाडस, गुजरातविरुद्ध उतरवली आपली खास प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---