इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामातील पहिला क्लॉलिफायर सामना मंगळवारी (23 मे) खेळला गेला. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि एमएस धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये हा सामना खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियवर धोनीने नाणेफेक गमावल्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. सीएसकेने आपली प्लेइंग इलेव्हन घोषित करताना कर्णधरा एमएस धोनी याच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली.
आयपीएळच्या चालू हंगामात एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील सीएसकेची सुरुवात अपेक्षित झाली नव्हती. पण धोनीच्या मार्गदर्शनात संघाने नंतरच्या सामन्यांमध्ये आपले प्रदर्शन सुधारले आणि चांगले पुनरागमन केले. संपूर्ण हंगामात सीएसकेच्या प्लेइंग इलेव्हमध्येही खूप कमी बदल पाहायला मिळाले. हंगामातील एकूण 10 सामन्यांमध्ये धोनीच्या संघात एकही बदल पाहायला मिळाला नाही. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा आयपीएलमधील एखात्या कर्णधाराने हंगामात 10 वेळा एकाच फ्लेइंग इलेव्हनसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे इतर संघांच्या कर्णधारांनी जास्तीत जास्त चार सामन्यांमध्ये एकसारखी प्लेइंग इलेव्हन खेळवली आहे.
पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी गुजरात प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महीश थीक्षणा.
गुजरात टायटन्स
शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), दसून शनाका, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.
(IPL 2023 Tenth time Dhoni has announced same Playing XI this season)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गजाने गांगुली-पॉंटिंगवर फोडले दिल्लीच्या पराभवाचे खापर, म्हणाले…
पैशांची तंगी? इंग्लंडच्या माजी कर्णधारावर आली रस्त्यावर केस कापण्याची वेळ, जगभरात रंगलीये चर्चा