---Advertisement---

पैशांची तंगी? इंग्लंडच्या माजी कर्णधारावर आली रस्त्यावर केस कापण्याची वेळ, जगभरात रंगलीये चर्चा

On: मंगळवार, मे 23, 2023 7:50 PM
Michael Vaughan
---Advertisement---

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर वॉन चांगलाच सक्रिय देखील असतो. भारतीय क्रिकेट संघ आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर नेहमी टीका करणारा वॉन सध्या भारतात आहे. इंडियन प्रीमियर लीगदरम्यान वॉन समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. मंगळवारी (23 मे) त्याने शेअर केलेल्या या सोशल मीडिया पोस्टची विशेष चर्चा होताना दिसते.

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) हंगामात एकापेक्षा एक रोमांचक सामने चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. मंगळवारी चालू हंगामातील प्लेऑफ फेरी सुरू झाली. क्लॉलिफायनर एक सामना हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळला जात आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. उभय संघांतील ही लढत सुरू होण्यापूर्वी मायकल वॉन (Michael Vaughan ) यांची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईतील एका रस्त्यावर वॉनने केस कापल्याचे दिसते. वॉनच्या या पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

वॉनने आपल्या पोस्टच्या कॅप्सनमध्ये लिहिले की, “मी आयपीएलच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईमध्ये असल्याचा आनंद आहे.” मायकल वॉनचे हे ट्वीट युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंडच्या मुंबईतील दुतावासानेही शेअर केले आहे. इंग्लंडच्या दुतावासाने “लय भारी,” या कॅप्शनसह वॉनचे ट्वीट कोट केले आहे.

दरम्यान, आयपीएल 2023मध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. मंगळवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात क्लॉलिफायर एक सामना खेळला जाणार आहे. क्लॉलिफायर एकमध्ये जिंकलेला संघ अंतिम सामन्यात धडक देईल. तर पराभूत होणाऱ्या संघाला क्लॉलिफायर दोनमध्ये एजून एक संधी मिळेल.  (Michael Vaughan had a haircut on the streets of Mumbai)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्ले ऑफ्स किंग होता रैना! धडाकेबाज कामगिरीने सार्थ केलेले मि.आयपीएल नाव
मनात भावना दाबून ठेवणाऱ्या धोनीच्या अश्रूंचा बांध ‘त्या’ रात्री तुटलेला, हरभजनचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---