भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने अनेक मोठ-मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम देखील काही कमी नाही. त्याने देखील अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये एकमेकांना मागे टाकण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळते. दरम्यान बाबर आजमने आणखी एक मोठा पराक्रम करत विराट कोहली आणि ख्रिस गेल सारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याने टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७ हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा कारनामा त्याने १८७ व्या टी२० डावात केला आहे. या बाबतीत त्याने विराट कोहली आणि ख्रिस गेल सारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. बाबर आजमने हा कारनामा पाकिस्तान राष्ट्रीय टी -२० चषक स्पर्धेत केला आहे.
पाकिस्तान राष्ट्रीय टी-२० चषक स्पर्धेत सेंट्रल पंजाब संघाकडून खेळताना त्याने अवघ्या २५ धावा करताच हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने १९२ डावात ७ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर भारतीय कर्णधार विराट कोहलीने हा कारनामा २१२ डावात केला होता.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७००० धावा करणारे क्रिकेटर
१८७ डाव – बाबर आझम
१९२ डाव – ख्रिस गेल
२१२ डाव – विराट कोहली
२२२ – ऍरॉन फिंच
२२३ – डेव्हिड वॉर्नर
राष्ट्रीय टी-२० चषक स्पर्धेत बाबर आजमची तुफान कामगिरी
बाबर आजमने पाकिस्तान संघासाठी खेळताना टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६१ सामन्यात ४६.८९ च्या सरासरीने २२०४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २० अर्धशतक झळकावले आहेत. तर फ्रेंचाइज क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ३०५८ धावांची नोंद आहे. तसेच पाकिस्तान सुपर लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग, बांगलादेश प्रीमियर लीग आणि वाईटॅलीटी ब्लास्ट स्पर्धेत त्याने एकूण ८४ सामने खेळले आहेत. यावर्षी राष्ट्रीय टी-२० चषक स्पर्धेत त्याने सर्वाधिक २५९ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे.
यापूर्वी बाबर आजमने टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले होते. विराटने टी -२० क्रिकेटमध्ये ५ शतक झळकावले आहेत. तर बाबर आजमने ६ शतक झळकावले आहेत. या बाबतीत त्याने रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहित शर्माच्या नावे ६ शतकांची नोंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय हॉकी संघाला तिसरा मोठा झटका; अर्जुन पुरस्कार विजेत्या एसव्ही सुनीलने घेतली निवृत्ती
दर आठवडल्याला २०७ किमीचा प्रवास, गुरुद्वाऱ्यातील लँगरवर भागवायचा भूक; आता आहे ‘भारताचा स्टार फलंदाज’