आयपीएलच्या मैदानात सोमवारी (४ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे एकमेकांसमोर आव्हान असणार आहे. हे दोन्ही संघांनी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ प्लेऑफमध्ये टॉप २ मध्ये जागा पक्की करेल. तर पराभूत झालेल्या संघाला दुसऱ्या क्रमांकासाठी संघर्ष करावा लागणार आहे. दोन्ही संघांची आयपीएलच्या चालू हंगामनातील कामगिरी एकसारखी राहिली आहे. त्यांनी प्रत्येकी १२ सामने खेळले असून त्यापैकी प्रत्येकी ९ सामने जिंकले आहेत.
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू न शकलेला पृथ्वी शॉ या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळायला तंदुरुस्त झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसच्या आजच्या सामन्यासाठी उपस्थित राहणार की नाही याबाबत अजून कसलीही माहिती समोर आली नाही.
चेन्नईचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो याआधी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विश्रांतीवर होता आणि चेन्नईला या सामन्यात सात विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. आजच्या सामन्यात त्याची उपस्थिती महत्वाची असणार आहे.
आयपीएलमध्ये यापूर्वी हे दोन संघ ३४ सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यापैकी चेन्नईने २१ सामन्यात विजय मिळवला आहे, तर दिल्ली कॅपिटल्सने १३ सामने जिंकले आहेत.
या सामन्यासाठी असा असू शकतो दिल्ली कॅपिटल्स संघाचा संभावित ११ खेळाडूंचा संघ
रिषभ पंत ( कर्णधार/यष्टिरक्षक), शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, ललित यादव, आर अश्विन, आवेश खान, एन्रीच नॉर्किए आणि कागिसो रबाडा
या सामन्यासाठी असा असू शकतो चेन्नई सुपर किंग्स संघाचा संभावित ११ खेळाडूंचा संघ
एमएस धोनी (कर्णधार/यष्टिरक्षक), फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर आणि जोश हेजलवूड.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० क्रिकेटमध्ये बाबर आजमची विश्वविक्रमी कामगिरी; विराट कोहली अन् ख्रिस गेलला टाकलंय मागे
वाढदिवस विशेष: यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
भारतीय हॉकी संघाला तिसरा मोठा झटका; अर्जुन पुरस्कार विजेत्या एसव्ही सुनीलने घेतली निवृत्ती