आजवर क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नव्याने तयार होत असतात तर अनेक विक्रम मोडीत निघत असतात. यामध्ये भारत आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये अनेकदा विक्रमांची रस्सीखेच पाहायला मिळत असते. अशातच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विराट कोहलीचा आणखी एक विक्रम मोडला आहे. टी२० सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम आता बाबरच्या नावावर झाला आहे.
पाकिस्तानी कर्णधार आता १०१४ दिवसांसाठी (२९ जून, बुधवारपर्यंत) पहिल्या स्थानावर आहे. यापूर्वी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता. आयसीसीच्या टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत १०१३ दिवस कोहली पहिल्या स्थानावर होता. आता मात्र, बाबर आझमने विराटला या विक्रमात पिछाडीवर टाकत नवा विक्रम रचला आहे.
बाबर सध्या मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये अप्रतिम खेळ दाखवत आहे. आयसीसीच्या यादीत तो अव्वल स्थानावर कायम आहे. आणि आता तो कसोटी क्रिकेटमध्येही आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, आयसीसीने बुधवारी आपली ताजी क्रमवारी जाहीर केली. भारताचा सलामीवीर इशान किशन टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका स्थानाने घसरून आठव्या क्रमांकावर आला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रोहित-राहुल नाही तर ‘ही’ जोडी भारतासाठी ठरलेय सुपरहिट! रचली सर्वात मोठी भागिदारी
टीम इंडियाचं ठरलंय! अशी असेल इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारताची ‘प्लेइंग ११’
हार्दिक पंड्याने चालवला कॅप्टन कूलचा वारसा, मालिका विजयानंतर केलेल्या कृत्याचं होतय तोंडभरून कौतुक