पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिका सुरू आहे. मंगळवारी (३० मार्च) या दोन संघामध्ये लाहोर येथे पहिला एकदिवसीय सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ८८ धावांनी जिंकला.
ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ विकेट्स गमावत ३१३ धावा केल्या. सलामिवीर फलंदाज ट्रेविड हेडने शानदार शतक करत १०१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ ४५.२ षटकांत २२५ धावांवरच सर्वबाद झाला. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने या सामन्या एक खास विक्रम नावावर केलाय.
बाबर आझमच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलद चार हजार धावा….
बाबर आझमचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४ हजार धावा पुर्ण झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १५ धावा केल्यानंतर त्याने हा विक्रम गाठला. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीच्या ८२ सामन्यांतच हा विक्रम केला आहे. बाबर वेस्टइंडिजचा दिग्गज फलंदाज विवियन रिचर्ड्सला मागे टाकले आहे.
रिचर्ड्स यांनी ८८ सामन्यांत हा विक्रम केला होता. बाबर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमलाच्या नावावर सर्वात कमी सामन्यांत ४००० धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने ८१ सामन्यांत हा विक्रम केला.
हेही वाचा – कसोटी इतिहासात कर्णधार बाबर आझमचे नाव सुवर्णक्षरात! धोनी, कोहली जवळपास पण नाही
https://www.instagram.com/p/CZ1g78eKo6W/?utm_source=ig_web_copy_link
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीत ९३ सामन्यांत ४००० हजार धावांचा विक्रम केला. बाबर आणि विराटची सतत तुलना केली जाते. याबाबतीत देखील बाबरने विराटपेक्षा कमी सामन्यांमध्ये हा विक्रम केला आहे.
ऑस्ट्रेलिया संघ २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. आता या दोन संघांमध्ये ३१ मार्चला दूसरा एकदिवसीय सामना तर २ एप्रिलला तीसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. तसेच या दोन संघामध्ये एक टी२० सुद्धा ५ एप्रिलला खेळली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पंजाबी तडका अन् कॅरेबियन मस्ती!’, शिखर धवनने विंडीज खेळाडूंसह धरला ठेका, Video व्हायरल
अबब..! मोहम्मद शमीच्या प्रेमात पडली ‘पॉर्नस्टार’? शुभेच्छा देताना लिहिलाय खास मेसेज
Video: विटांच्या वेगवेगळ्या रचना करताना दिसला चेन्नई संघ, धोनी-जडेजाचाही उपक्रमात सहभाग