ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने १-० ने जिंकली आहे. सध्या या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने, तर दूसरा सामना पाकिस्तानने जिंकला. जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक असलेल्या बाबर आझम याने आपल्या संघासाठी अनेक विक्रम केले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या दूसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाबर आझमने शतकी खेळी खेळत विश्वविक्रम केला आहे.
उजव्या हाताचा फलंदाज बाबर आझम (Babar Azam) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १५ शतके करणारा फलंदाज बनला आहे. या सामन्यात बाबरने ७३ चेंडूत १० चौकारांच्या आणि एका षटकाराच्या मदतीने आपले शतक पुर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १५ वे शतक आहे, जे त्याने आपल्या ८३ व्या एकदिवसीय डावातच पुर्ण केले आहे.
बाबर आझमने हा विक्रम करत दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम अमलाला मागे टाकले आहे. बाबर आझमच्या अगोदर अमलानी सर्वात कमी ८६ डावांत १५ शतके ठोकली होती, तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १०६ डावांत १५ शतके पूर्ण केली आहेत. तसेच शिखर धवनने हा १५ शतके १०८ डावात पूर्ण केली आहेत. सईद अनवरने १४३ तर सौरव गांगुलीने १४४ डावांत १५ एकदिवसीय शतके पूर्ण केली आहेत.
https://twitter.com/TheRealPCB/status/1509586093355802637
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नुकताच अजून एक विक्रम केला आहे, त्याने ऑस्ट्रलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वनडे क्रिकेटमधील ४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने ८२ डावातच ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत तो दूसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलला मिस करतोय सॅम करन; म्हणाला, ‘मला आयपीएलमध्ये सहभागी व्हायचे होते, पण…’
चेन्नईच्या घशातून लखनऊ सामना हिसकावला, पण त्याला कारणीभूत ठरलेल्या ५ गोष्टी म्हणजे…