आशिया चषक 2022 मधील चौथा सुपर फोर सामना अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने शानदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानचा डाव 129 धावांवर रोखला. 130 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला पुन्हा एकदा अपयश आले. बाबर याने खातेही न खोलता पहिल्याच चेंडूवर रस्ता धरला. आशिया चषकातील सलग चौथ्या सामन्यात तो अपयशी ठरला आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध सामना जिंकून आशा चषकाच्या अंतिम फेरीत जागा बनवण्याच्या इराद्याने पाकिस्तान संघ मैदानात उतरला. गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत अफगाणिस्तानला केवळ 129 धावांवर रोखले. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर फजलहक फारुखीने त्याला पायचित केले. तो पहिला चेंडूवर बाद होत गोल्डन डकमध्ये तंबूत परतला. तो आशिया चषकातील चार सामन्यात मिळून केवळ 33 धावा बनवू शकला आहे.