पाकिस्तान संघाचा नवा कर्णधार बाबर आझमची गणना सध्याच्या सर्वोत्कृष्ठ फलंदाजांमध्ये केली जाते. काही लोक त्याची तुलना ही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी करतात. मात्र, पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू तनवीर अहमदने आझमला सल्ला दिला आहे. तो म्हणाला की, “आझमला इंग्रजी बोलायला शिकण्याची आवश्यकता आहे. तसेच त्याला व्यवस्थित कपडे घालण्याच्या पद्धतीत आणि त्याच्या व्यक्तिमत्वात (पर्सनॅलिटी) सुधार करण्याची गरज आहे.”
तनवीरच्या या सल्ल्यावर आझमने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “मी एक क्रिकेटपटू आहे. माझे काम क्रिकेट खेळणे हे आहे. मी इंग्रज नाही की मला इंग्रजी व्यवस्थित बोलता येईल. हो मी यावर काम करत आहे. पण, कोणही वेळेनुसार सगळ्या गोष्टी शिकत असते. अचानक तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकू शकत नाही.”
पाकिस्तानचे माजी कर्णधार सरफराज अहमदसह अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंना इंग्रजी बोलायला येत नसल्याने ट्रोल केले जात असायचे. कदाचित या कारणामुळेच तनवीरने आझमला त्याची इंग्रजी सुधारण्याचा सल्ला दिला असावा.
मात्र, तनवीरच्या या वक्तव्यामुळे त्याला आझमच्या चाहत्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काही चाहत्यांनी म्हटले आहे की, आझमची इंग्रजी आणि त्याचे व्यक्तिमत्त्व हे पाकिस्तान संघापेक्षा आणि त्याच्या प्रदर्शनापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे का?
शिवाय, पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज आझमने त्याच्या आवडी निवडींविषयी सांगितले आहे. त्याला क्रिकेटव्यतिरिक्त बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही सीरिज पाहायला खूप आवडते. त्याचा आवडता अभिनेता हा शाहरुख खान आहे. तर आलिया भट्ट ही त्याची आवडती अभिनेत्री आहे. तसेच त्याला राहत फतेह अली खानचे गाणे ऐकायलाही खुप आवडतात. Babar Azam favourite actor is shahrukh khan and actress is alia bhatt.
ट्रेंडिंग घडामोडी-
भारतीय संघाचा ‘हा’ खेळाडू आफ्रिदीचं कधी नावही घेतं नाही,…
दिनेश कार्तिक होणार होता मुंबई इंडियन्सचा कर्णधार, या खेळाडूने पुढाकार…
तब्बल ३७ लाख रुपयांना विकलं गेलं माजी कर्णधाराचं स्टीलचं ब्रेसलेट,…