भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू स्म्रीती मंधाना आणि जेमिमाह रोड्रिगेज यांनी डबल ट्रबल नावाचा शो सुरु केला आहे. या शोमध्ये या दोन्ही महिला क्रिकेटपटू २ वेगवेगळ्या क्रिकेटपटूंशी इंस्टाग्रामवर लाइव्ह चॅट करतात. त्यांनी शोच्या ६व्या एपिसोडमध्ये भुवनेश्वर कुमार आणि झूलन गोस्वामी यांच्यांशी संवाद साधला. दरम्यान स्म्रीतीच्या एका प्रश्नाला भुवनेश्वरने खूप मजेशीर उत्तर दिले आहे. Bhuvneshwar Kumar Prays Bajarang Bali Before Last Over Of Match.
स्म्रीतीने भुवनेश्वरला सामन्यातील शेवटचे षटक टाकताना डोक्यात काय चालू असते? असे विचारले असता. भुवनेश्वर म्हणाला की, “तो शेवटचे षटक टाकण्यापुर्वी बजरंग बलीचे नाव घेत असतो. मग, तो गोलंदाजी करण्यास सुरुवात करतो. गोलंदाजीतले वेगळेपण महत्त्वाचे असते, विशेषत: टी२० क्रिकेटमध्ये. सर्वांना माहिती आहे की, यॉर्कर हे गोलंदाजीचे सर्वात चांगले हत्यार आहे. पण, आता सर्वच गोलंदाज यॉर्कर टाकतात. त्यामुळे फलंदाजांसाठी यॉर्कर चेंडूचा सामना करणे जास्त कठीण नाही.”
“क्षेत्ररक्षणानुसार फलंदाज अगोदरच नियोजन करुन ठेवतात की, या गोलंदाजाच्या यॉर्करवर कुठे चेंडू मारायचा आहे. अशात गोलंदाजीत वेगळेपण असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे शेवटचे षटक टाकताना फलंदाजाची स्ट्रेंथ काय असेल. तो कुठे कमजोर पडेल, म्हणजे त्याला कोणत्या बाजूला कमीत कमी धावा घेता येतील. या सर्व गोष्टी डोक्यात ठेवून मी गोलंदाजी करत असतो,” असेही भुवनेश्वर म्हणाला.
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये जन्मलेला भुवनेश्वर हा जगातील एकमेव गोलंदाज आहे. ज्याने क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात आपली पहिली विकेट घेणाऱ्या फलंदाजाला त्रिफळाचीत केले आहे. तो पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आला, जेव्हा त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सचिनला पहिल्यांदा बाद केले होेते.
भुवनेश्वरने २०१२ला टी२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले होते. त्यावेळी त्याने पाकिस्तानचा फलंदाज नासिर जमशेदला त्रिफळाचीत करत आपली पहिली विकेट घेतली होती. त्याचवर्षी त्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात त्याने मोहम्मद हाफिजला शून्यावर त्रिफळाचीत केले होते. तर, ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नरची त्याने कसोटीतील पहिली विकेट घेतली होती. त्याने वॉर्नरलाही त्रिफळाचीत केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
दिनेश कार्तिक होणार होता मुंबई इंडियन्सचा कर्णधार, या खेळाडूने पुढाकार घेतं केले रोहितला…
तब्बल ३७ लाख रुपयांना विकलं गेलं माजी कर्णधाराचं स्टीलचं ब्रेसलेट,…
अर्जून तेंडूलकरचे केस कापले थेट मास्टर ब्लास्टरने, खास व्हिडीओ पहा