---Advertisement---

बाबर आझमनं कसोटीमध्ये शेवटचं अर्धशतक कधी ठोकलं होतं? अशा प्रकारे बनला हिरोचा झिरो!

On: शुक्रवार, ऑक्टोबर 11, 2024 4:17 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचा फ्लॉप शो जारीच आहे. इंग्लंडविरुद्ध मुलतान कसोटीच्या दोन्ही डावांत बाबर पुन्हा एकदा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. बाबरनं पहिल्या डावात 30 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात तो केवळ 5 धावा करून बाद झाला. विशेष म्हणजे, बाबरनं कसोटीत शेवटचं अर्धशतक झळकावून बराच काळ लोटला आहे.

मुलतान कसोटीत पाकिस्तानच्या तीन फलंदाजांनी शतकं झळकावली. याच मैदानावर इंग्लंडच्या जो रुटनं द्विशतक ठोकलं, तर हॅरी ब्रूकनं त्रिशतक झळकावलं. मात्र फलंदाजांसाठी नंदनवन असणाऱ्या या खेळपट्टीवरही बाबर आझमला त्याचा हरवलेला फॉर्म सापडला नाही. बाबरनं पहिल्या डावात 71 चेंडूंचा सामना करत 30 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्यानं पाच चौकार मारले. मात्र बाबर क्रीजवर सेट होताच ख्रिस वोक्सनं त्याला पायचीत केलं. दुसऱ्या डावात तर बाबर आझम अवघ्या 5 धावांवर बाद झाला. विकेटमागे कीपरनं त्याचा सोपा झेल घेतला.

बाबर आझमनं कसोटी क्रिकेटमध्ये शेवटचं अर्धशतक 2022 मध्ये ठोकलं होतं. तेव्हापासून त्याला क्रिकेटच्या दीर्घ फॉरमॅटमध्ये 50 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. बाबरनं डिसेंबर 2022 मध्ये कसोटीत शेवटचं शतक झळकावलं होतं. याचाच अर्थ, गेल्या दोन वर्षात बाबर या फॉरमॅटमध्ये खूप वाईट पद्धतीनं फ्लॉप होत आहे.

बाबर आझमच्या फलंदाजीबाबत एक बाब आहे की, तो चांगली सुरुवात करतो परंतु क्रिझवर सेट होताच आपली विकेट फेकतो. बाबरनं गेल्या 10 डावांमध्ये 20 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर सहा वेळा विकेट गमावली आहे. बाबरच्या या ढासळत्या फॉर्ममुळे पाकिस्तान संघाचीही झोप उडाली आहे. सर्वात निराशाजनक बाब म्हणजे बाबरला आता त्याच्या स्वत:च्या भूमीतही धावा करता येत नाहीये.

हेही वाचा – 

पाकिस्तानच्या कर्णधाराची हकालपट्टी? लाजिरवाण्या पराभवानंतर पीसीबी घेणार मोठा निर्णय
PAK vs ENG: ‘हा एक सांघिक खेळ पण…’, शान मसूदने पराभवाचा दोष कोणाला दिला?
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या नावे हे 5 लाजिरवाणे रेकॉर्ड, एकदा वाचाच!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---