भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात प्रत्येक क्षणी रोमांचक काहीतरी घडत आहे. या सामन्याच्या पहिलाय डावात भारतीय संघाने 181 धावांचा पल्ला गाढला. त्याचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये पाकिस्तानी संघाने चांगली सुरुवात केली. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि चोथ्या ओव्हरमध्ये पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला रवी बिश्नोईने बाद केले आणि भारताला सामन्यात वरच्या स्तरावर नेऊन ठेवले.
https://twitter.com/_raj_29/status/1566460634526392321
Ravi Bishnoi strikes and picks up an all important wicket of the Pakistan Captain, Babar Azam.
Live – https://t.co/xhki2AW6ro #INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/i9QjzcOYZo
— BCCI (@BCCI) September 4, 2022
भारताने उभारलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी कर्णधारावर दबाव होता. मात्र, या दबावात बाबार एक खराब शॉट खेळत रवी बिश्नोईला आपली विकेट देऊन बसला. यावेळी बाबर आझमला 10 चेंडूत केवळ 14 धावा करण्यात यश आले. आणि विशेष म्हणजे पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळणाऱ्या रवी बिश्नोईने यावेळी बाबरला बाद करत भारताच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsPAK: राजाचं राजपण कालपण आजपण! क्लासिक कोहलीचे धमाकेदार अर्धशतक
‘ही संधी म्हणजे माझ्यासाठी मोठी बाब!’, एनसीएतील युवकांना मिळाले बुमराहचे मार्गदर्शन