काही काळापासून खराब फॉर्ममधून जात असलेला पाकिस्तानचा स्टार फलंदाज ‘बाबर आझम’ने (Babar Azam) दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 73 धावांची खेळी खेळून फॉर्ममध्ये पुनरागमन केले. बाबरच्या या खेळीने त्याला एका मोठ्या कामगिरीच्या जवळ आणले. बाबरने वनडेत 5,905 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात तो 95 धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो एक मोठा रेकाॅर्ड करेल.
तिसऱ्या वनडे सामन्यात 95 धावांच्या खेळीसह बाबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6,000 धावांचा आकडा पूर्ण करेल. यासह तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 6,000 धावा पूर्ण करणारा फलंदाज बनेल. सध्या हा रेकाॅर्ड ‘हाशिम आमला’च्या (Hashim Amla) नावावर आहे, ज्याने 123 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. बाबरने आतापर्यंत 119 डावांमध्ये 5,905 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 19 शतकांसह 33 अर्धशतके झळकावली आहेत.
बाबर आझम (Babar Azam) वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 6,000 धावा पूर्ण करणारा फलंदाज बनण्याच्या बाबतीत विराट कोहली (Virat Kohli) आणि ‘डेव्हिड वॉर्नर’सारख्या (David Warner) दिग्गज फलंदाजांना मागे टाकण्याच्या जवळ आहे. विराटने 136 डाव खेळून 6,000 धावांचा आकडा गाठला. तर वॉर्नरने 139 डावात 6,000 धावा पूर्ण केल्या. ‘केन विल्यमसन’ही (Kane Williamson) वॉर्नरच्या बरोबरीने आहे. ‘शिखर धवन’ने (Shikhar Dhawan) 140 डाव खेळून ही कामगिरी केली. हाशिम आमला (Hashim Amla) 123 डावांत हा आकडा गाठून दुसऱ्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या सामन्यात मोठा राडा! खेळाडूंकडून शिवीगाळ? अंपायर बचावासाठी आले
3 सध्याचे भारतीय फलंदाज मेलबर्नच्या मैदानावर आजपर्यंत एकही शतक, अर्धशतक झळकावू शकले नाहीत
बंड्या मारुती, अमर क्रीडा यांची चुरशीच्या लढतीनंतर उपांत्यपूर्व फेरीत धडक