बुधवारी (८ जून) पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना पाकिस्तानने ५ विकेट्सने जिंकला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने विजयामध्ये सर्वात महत्वाचे योगदान दिले. सोबतच एका खास विक्रमांची नोंद स्वतःच्या नावावर केली.
बाबर आजम (Babar Azam) या सामन्यात एकूण १०७ चेंडू खेळला आणि १०३ धावा केल्या. या धावा करण्यासाठी बाबरने ९ चौकारांची मदत घेतली. या अप्रतिम प्रदर्शानादरम्यान, त्याने कर्णधाराच्या रूपात स्वतःच्या १००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या. कर्णधाराच्या रूपात बाबर सर्वात कमी डावांमध्ये १००० एकदिवसीय धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधाराच्या रूपात सर्वात वेगवान १००० धावा करणाऱ्यांमध्ये बाबर आजम पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने १३ एकदिवसीय डावांंमध्ये की किमया केली आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) आहे, ज्याने १७ एकदिवसीय डावांमध्ये १००० धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकी दिग्गज एबी डिविलियर्स आहे, ज्याने कर्णधाराच्या रूपात १००० एकदिवसीय धावा करण्यासाठी १८ डाव खेळले होते. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आहे, ज्याने ही कामगिरी करण्यासाठी २० डाव खेळले. ऑस्ट्रेलियन दिगर्गज ऍलिस्टर कूक पाचव्या आहे, ज्याने ही कामगिरी करण्यासाठी २१ डाव खेळले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १००० धावा करणारे कर्णधार
१३ डाव – बाबर आजम*
१७ डाव – विराट कोहली
१८ डाव – एबी डिविलियर्स
२० डाव – केन विलियम्सन
२१ जाव – ऍलिस्टर कुक
दरम्यान, उभय संघात बुधवारी खेळल्या गेलेल्या या सामन्याचा विचार केला, पाकिस्तनला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने ८ विकेट्सच्या नुकसानावर ३०५ धावा केल्या. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रऊफने ४ विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आणि सलामीवीर ईमाम उल हक (६५) यांनी सर्वाधिक धावांचे योगदान दिले आणि संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकांमध्ये खुशदिल शाहने महत्वाच्या ४१ धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दीडशेहून अधिक वेगाने बॉलिंग करणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजावरील बॅन हटला, ‘या’ कारणामुळे आणली होती बंदी
न्यूझीलंडच्या महिलांनी बनवलेला ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड पुरुषांनाही मोडता आला नाही, टाका एक नजर
‘मी ही जागा कुठेतरी पाहिलीये’, दिनेश कार्तिकच्या पुनरागमनावर माजी दिग्गजाची प्रतिक्रिया व्हायरल