सध्या इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहेे. या दौऱ्यावरील पहिल्या कसोटी सामन्यात विक्रमांची रांग लागली. इंग्लंडच्या पहिल्या डावात चार फलंदाजांनी शतके झळकावली. तर पाकिस्तानच्या पहिल्या डावात 3 फलंदाजांनी शतके झळकावली. यात बाबर आझमच्याही शतकाचा समावेश होता. मात्र, बाबरच्या या शतकाने विक्रम घडवला आहे. या सामन्यात झळकावलेल्या शतकामुळे एका वर्षात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहचला. त्याने इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टो याला मागे टाकले. बेयरस्टो याच्या नावावर एकूण 6 शतके आहे. बेयरस्टो हा दुखापतग्रस्त असल्याने चार महिन्यापासून क्रिकेटपासून लांब आहे.
बाबर आझम (Babar Azam) याने तिसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केेले. कसोटी क्रिकेटमध्ये हे त्याचे आठवे शतक आहे, ज्यातली सात शतके त्याने याच वर्षी झळकावली. बाबरने या सामन्यात 136 धावांची खेळी केली.
2022 या वर्षी सर्वात जास्त शतक झळकावणारे फलंदाज
बाबर आझम (Babar Azam) (पाकिस्तान)- 7 शतके
जॉनी बेयरेस्टो (Johny Bairstow)(इंग्लंड)- 6 शतके
इमाम उल हक (Imam-ul_Haq)(पाकिस्तान)- 5 शतके
जो रुट (Joe Root) (इंग्लंड) – 5 शतके
उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) (ऑस्ट्रेलिया)- 4 शतके
बाबर आझम याने पाकिस्तान संघासाठी 45 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 48.63 सरासरीने 3258 धावा केल्या.
इंग्लंड आणि पाकिस्तान या संघामध्ये पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे खेळवला जातोय. या सामान्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवत इंग्लंडच्या फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली. इंग्लंडने पहिल्या डावात 657 धावांचा डोंगर उभारला. यात त्यांच्या सलामीवीरांचे मोलाचे योगदान होते. इंग्लंड संघासाठी झॅक क्राऊली (Zack Crowely), बेन डकेेट (Ben Duckett), ओली पोप (Olie Pope) आणि हॅरी ब्रूक (Harry Brook) यांनी शतके झळकावली.
पाकिस्तान संघाच्या सध्या 7 बाद 499 धावा झाल्या आहेत. पाकिस्तान संघासाठी 3 फलंदाजांनी शतके झळकावली. यात अब्दुल्लाह शफीक (Abdullah Shafique), इमाम-उल-हक आणि बाबर आझम यांनी शतके लगावली आणि इंग्लंडने दिलले आव्हान कमी वाटू लागले.(Babar Azam has smashed most hundreds in calender year 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विराटमूळे चहलची कारकीर्द बहरली’, भारतीय दिग्गजाकडून युझी पुन्हा टार्गेट
रोहित म्हणतोय, “आम्ही विश्वचषकाचा विचारच करत नाही”