कोविड-१९ मुळे बंद असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. जुलैमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका झाली. त्यानंतर पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाने देखील इंग्लंडचा दौरा केला. कॅरेबियन प्रीमियर लीगनंतर बहुप्रतिक्षित आयपीएलचा देखील आज समारोप होत आहे. याचदरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली.
या वर्षाअखेरीस न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या पाकिस्तान संघाचा कसोटी कर्णधार म्हणून भरवशाचा फलंदाज बाबर आझमची निवड केली आहे. एकदिवसीय आणि टी२० संघाचा कर्णधार असलेला बाबर आता कसोटी कर्णधार म्हणून अझर अलीची जागा घेईल. पाकिस्तान संघ न्यूझीलंड दौर्यावर तीन टी२० व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
पाकिस्तानचे माजी खेळाडू वसीम अक्रम आणि शोएब अख्तर यांनी काही दिवसांपूर्वीच, बाबर आझमला लवकरात लवकर पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार बनविण्यात यावे, अशी मागणी केली होती. बाबर आझमने आत्तापर्यंत पाकिस्तानसाठी २९ कसोटी सामने खेळताना ४५.४५ च्या सरासरीने २,०४५ धावा काढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL FINAL: बोल्टची चमक! हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक बळी घेत ‘या’ दिग्गजांची केली बरोबरी
फायनलमध्ये अर्धशतकासह कर्णधार अय्यर ठरला दिल्लीसाठी ‘श्रेयस’, नवा विक्रमही केलाय नावावर
बिहार निवडणूक : मुख्यमंत्री पदाच्या विजयी उमेदवाराने आजच्याच दिवशी केले होते धोनीच्या संघात पदार्पण
ट्रेंडिंग लेख-
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय