---Advertisement---

बाबर आझमची बीबीएलमध्ये एंट्री! पण IPL अनकॅप्ड खेळाडूपेक्षाही पगार कमी

On: शुक्रवार, जून 13, 2025 10:06 PM
---Advertisement---

Babar Azam Sydney Sixers: ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग 2025 (BBL 2025) सुरू होणार आहे. यासाठी संघांमध्ये खेळाडूंची निवड सुरू झाली आहे. पाकिस्तानी खेळाडू बाबर आझमला सिडनी सिक्सर्स संघाने आपल्या संघात सामील करून घेतले आहे. (Babar Azam Sydney Sixers) बीबीएलमध्ये ओव्हरसीज ड्राफ्टच्या आधी “प्री-ड्राफ्ट साइन” असते, ज्यामध्ये प्रत्येक संघ एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची निवड करू शकतो. याच प्रक्रियेद्वारे सिडनी सिक्सर्सने बाबरला आपल्या संघात घेतले आहे. या संघाचा भाग ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ देखील आहे.

बिग बॅश लीगमधील सर्व फ्रँचायझी एका ठराविक सॅलरी क्रायटेरियाअंतर्गत काम करतात, ज्यामध्ये एका श्रेणीतील खेळाडूंना समान मानधन दिले जाते. याशिवाय संघ 2 खेळाडूंना 50,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सवर साइन करतो. तसेच परदेशी पुरुष खेळाडूंना 4,20,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सवर साइन केले जाते.

सिडनी सिक्सर्सही हाच पॅटर्न फॉलो करते. मात्र टी20 क्रिकेट आणि पाकिस्तान सुपर लीगमधील बाबर आझमच्या कामगिरीचा विचार करता, सिडनी सिक्सर्स बाबरला 4,20,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सपेक्षा थोडे कमी रक्कमच देऊ शकते. भारतीय करंसीनुसार ही रक्कम सुमारे 2.35 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

बाबर आझम हे पाकिस्तानी क्रिकेटमधील मोठं नाव आहे. मात्र सध्या बाबर पाकिस्तानच्या टी20 संघाबाहेर आहेत. बाबरला बीबीएलमध्ये मिळणारी सॅलरी ही IPLमध्ये खेळणाऱ्या अनकॅप्ड (ज्यांनी आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही) खेळाडूंपेक्षा खूपच कमी आहे. पंजाब किंग्सने प्रियांश आर्यला IPL 2025 मध्ये 3.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. प्रियांशने अद्याप भारतीय क्रिकेट संघासाठी पदार्पण देखील केलेले नाही. पण बाबरचा समावेश पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंमध्ये होतो, तरीही त्यांना BBLमध्ये मिळणारी सॅलरी प्रियांशच्या मानाने खूपच कमी आहे. (Babar Azam vs uncapped IPL players)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---