पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमची बॅट बऱ्याच दिवसांपासून शांत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टी20 सामन्यात त्यानं चांगली फलंदाजी केली होती. मात्र त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो शून्यावर बाद झाला. गेल्या 10 सामन्यांमध्ये बाबर आझमनं एकही अर्धशतक झळकावलेलं नाही. यामुळे आता त्याच्यावर संघातून बाहेर होण्याची टांगती तलवार लटकत आहे. त्याला एकदा खराब फॉर्ममुळे कसोटी संघातूनही वगळण्यात आलं होतं. आता त्याला टी20 संघातूनही वगळलं जाईल का? हा मोठा प्रश्न आहे.
जर आपण बाबर आझमच्या गेल्या एक वर्षातील टी20 आंतरराष्ट्रीय आकडेवारीबद्दल बोललो, तर त्यानं 2024 मध्ये आतापर्यंत 23 सामने खेळले. यापैकी त्यानं 22 डावांमध्ये फलंदाजी केली. तो एकदा नाबाद राहिला आणि एकूण 707 धावा केल्या. बाबरची यावर्षीची सर्वोत्तम धावसंख्या 75 धावा आणि सरासरी 33.66 आहे. त्याचा स्ट्राइक रेट 132.39 राहिला. या वर्षी त्यानं 6 अर्धशतकं झळकावली आहेत. तो दोनदा खातं न उघडता बाद झाला. बाबरनं यावर्षी 73 चौकार आणि 19 षटकार मारले आहेत. विशेषत: डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांनी त्याची झोप उडवली आहे. गेल्या तीन वर्षांत डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध बाबरची सरासरी 20 पेक्षा कमी आहे.
बाबर आझमनं गेल्या 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकही अर्धशतक झळकावलेलं नाही. गेल्या 10 टी20 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून केवळ 237 धावा निघाल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी केवळ 26.33 एवढी राहिली. तर स्ट्राइक रेट 116 पेक्षा कमी आहे.
गेल्या 10 सामन्यांत बाबरला एकही शतक किंवा अर्धशतक झळकावता आलेलं नाही. जर आपण चौकार आणि षटकारांबद्दल बोललो तर त्याला गेल्या 10 सामन्यांमध्ये केवळ 21 चौकार आणि 4 षटकार मारता आले आहेत. इतकंच नाही तर गेल्या 10 सामन्यांपैकी पाकिस्ताननं फक्त 2 सामने जिंकले आहेत. हे दोन विजय आयर्लंड आणि कॅनडा सारख्या दुय्यम संघांविरुद्ध आले आहेत.
हेही वाचा –
आयसीसी क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडला मोठा फायदा! भारतीय खेळाडूंची घसरण
काय सांगता! वेळेवर न आल्यामुळे या खेळाडूला सोडून निघून गेली टीम इंडिया!
गुजरात टायटन्ससाठी मोठी बातमी, आयपीएल 2025 पूर्वी स्टार खेळाडूची शस्त्रक्रिया यशस्वी