---Advertisement---

गावसकरांकडून बॅटिंग टिप्स घेऊन बाबर आझम आता भारताला देणार टेन्शन, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, ऑक्टोबर 17, 2022 6:39 PM
Sunil-Gavaskar-And-Babar-Azam
---Advertisement---

सध्या क्रिकेट प्रेमींना सर्वात जास्त कोणत्या सामन्याची उत्सुकता असेल, तर ती म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची. टी20 विश्वचषक 2022मधील भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामन्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याचा एक व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर हेदेखील दिसत आहेत.

दोघांमध्ये काय झाली चर्चा?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, आधी बाबर आझम (Babar Azam) आणि सुनील गावसकर (Sunil Gavaskar) एकमेकांची विचारपूस करतात. त्यानंतर गावसकर बाबरला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतात. खरं तर, 15 ऑक्टोबर रोजी बाबरने त्याचा 28वा वाढदिवस साजरा केला होता. यानंतर गावसकरांनी बाबरला फलंदाजीच्या टिप्सही दिल्या. त्यांनी त्याला समजावत सांगितले की, “जर तुझी शॉट मारण्याची निवड चांगली असेल, तर मग काही चिंता नाही. परिस्थितीनुसार शॉटची निवड कर.” या दोघांव्यतिरिक्त व्हिडिओमध्ये माजी पाकिस्तानी खेळाडूंसोबत सध्याच्या संघातील अनेक खेळाडू दिसत आहेत.

गावसकरांकडून घेतला ऑटोग्राफ
फलंदाजीच्या टिप्स दिल्यानंतर गावसकरांनी बाबरला (Sunil Gavaskar And Babar Azam) त्याच्या टोपीवर आपला ऑटोग्राफ दिला. विशेष म्हणजे, यापूर्वीही बाबरने रोहित शर्माचे कौतुक करत सर्वांचे मन जिंकले आहे. विश्वचषकापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने रोहितला मोठा म्हणत सांगितले होते की, “मी त्याच्याकडून अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो.”

मागील वर्षी भारतावर भारी पडलेला पाकिस्तान संघ
मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान संघाने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले होते. त्या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली (Virat Kohli) करत होता. मात्र, यावेळी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्मा याच्या खांद्यावर आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा राग न्यूझीलंडवर काढला! दक्षिण आफ्रिकेने 9 विकेट्सने मारलं मैदान
सराव सामन्यात इंग्लंडने पाकचा उडवला धुव्वा! युवा इंग्लिश फलंदाजांनी केली षटकार-चौकारांची बरसात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---