टी-20 विश्वचषकात पाकिस्तान आणि त्यांच्या संघाच्या खराब कामगिरीबाबत बराच वाद सुरु आहे. त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. या टीकेदरम्यान बाबर आझमसाठी एक आनंदाची बातमी आहे. यातून त्यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्याने आयसीसी वर्ल्ड टी20 क्रमवारीत झेप घेतली आहे.
आयसीसीने टी20 विश्वचषक 2024 साठी जागतिक टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये बाबर आझमसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, बाबर आझमने पुरुषांच्या टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत झेप घेतली आहे. यापूर्वी तो जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर होता. आता त्याने तिसरे स्थान पटकावले आहे. बाबर आझमचे जागतिक रेटिंग आता 756 झाले आहे.
A strong start to the #T20WorldCup has seen a new No.1 ranked all-rounder crowned on the latest ICC Men’s Player Rankings 👀
Details ⬇https://t.co/sUroyHnKQU
— ICC (@ICC) June 12, 2024
त्याचबरोबर भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने पहिल्या क्रमांकावर सातत्य राखण्यात यश मिळवले आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने दोन स्थानांनी प्रगती करत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड 6 स्थानांनी झेप घेत अव्वल 10 मध्ये सामील झाला आहे.
बाबर आझमच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, कसोटीमध्ये बाबर आझमने आतापर्यंत 52 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 54.9 च्या स्ट्राइक रेटने 3898 धावा केल्या आहेत. यामध्ये 25 अर्धशतके आणि 9 शतकांचा समावेश आहे. बाबरची कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या 196 धावा आहे. तर बाबर आझमने आतापर्यंत 117 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 117 सामन्यांमध्ये त्याने 88.8 च्या स्ट्राइक रेटने 5729 धावा केल्या आहेत. यामध्ये 32 अर्धशतके आणि 19 शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात बाबरची सर्वोच्च धावसंख्या 158 धावा आहे. बाबरने आतापर्यंत 122 टी-20 सामने खेळले आहेत. या 122 सामन्यांमध्ये त्याने 129.5 च्या स्ट्राइक रेटने 4113 धावा केल्या आहेत. यामध्ये 36 अर्धशतके आणि ३ शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात बाबरची सर्वोच्च धावसंख्या 122 धावा आहे.
महत्तवाच्या बातम्या-
लाख-कोटी नाही, सीएसकेची ब्रँड व्हॅल्यू अब्जावधीत आहे; रक्कम जाणून तुम्ही पण व्हाल थक्क!
रिषभ पंत भारताचा दुसरा युवराज सिंग? कपिल देव यांनी दिली खळबळजनक प्रतिक्रिया!
कॅनडा विरुद्धच्या सामन्यात हारिस रौफ चमकला, रचला इतिहास!