आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून नुकतीच खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली गेली. यावेळच्या क्रमवारीत मोठे फेरबदल पाहायला मिळाले. पाकिस्तानचा बाबर आझम पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघाचा युवा स्टार फलंदाज शुबमन गिल याला क्रमवारीत नुकसान झाले आहे.
शुबमन गिल (Shubman Gill) मागच्या काही दिवसांपूर्वी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. पण आता बाबर आझम (Babar Azam) याने गिलला मागे टाकले असून पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या बाबरकडे 824 रेटिंग पॉइंट्स आहेत, तर गिल 810 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. विराट कोहली (775) यादीत तिसऱ्या, तर रोहित शर्मा (775) चौथ्या क्रमांकावर आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकत भारताच्या या तिन्ही फलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन केले होते. याच प्रदर्शनाचा लाभ म्हणून विराट आणि रोहित क्रमवारीत वरच्या स्थानी पोहोचले आहेत. विश्वचषकादरम्यानच गिलने बाबारला मागे टाकत वनडे क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला होता.
Babar Azam becomes the new No.1 Ranked ODI batter. pic.twitter.com/CJ5rwUG9CE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 20, 2023
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. असे असले तरी, गिल, विराट आणि रोहित या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेत विश्रांती दिली गेली आहे. दक्षिण आफ्रिकेचा रासी वॅन डर ड्युसेन आणि हेनरिक क्लासेन यांना प्रत्येकी एक-एका क्रमांकाने खाली घसलले आहेत. अनुक्रमे आठ आणि दहाव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे हे फलंदाज सध्या आहेत. आयरलँडचा हॅरी टेक्टर वनडे फलंदाजांच्या यादीत एका क्रमांकाची आघाडी घेत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोई काही दिवसांपूर्वी टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज होता. पण ताज्या क्रमवारीत बिश्नई तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. अपगाणिस्तनचा राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पण इंग्लंडच्या आदिल राशीद याने तीन स्थानांची झेप घेत थेट पहिला क्रमांक गाठला. राशीदने वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत सहा विकेट्स घेतल्या होत्या, ज्याचा फायदा त्याला क्रमवारीत मिळाला. श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा चौथ्या, तर महेश थिक्षाना पाचव्या क्रमांकावर आहेत.
टी-20 फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादव (887) पहिल्या क्रमांकावर कायम आहे. सूर्यकुमारने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार शतक ठोकले आणि भारताला विजय मिळवून दिला होता. पाकिस्तानचा अनुभवी यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान (787) यादीत दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिकेचाच ऍडेन मार्करम (755) यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा चार स्थानांची झेप घेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बाबर आझम मात्र एका स्थानाने खाली घसरून पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. डेव्हिड वॉर्नर (नऊ स्थानांची झेप घेत 27व्या क्रमांकावर) आणि मिचेल मार्श (12 स्थानांची झेप) यांनाही ताज्या कसोटी क्रमवारीत लाभ झाला आहे. केन विलियम्सन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. (Babar Azam overtakes Shubman Gill in ICC rankings)
महत्वाच्या बातम्या-
18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत 16 संघ सहभागी
इतिहास घडला! बांगलादेशी पठ्ठ्याने केली सचिनचा 14 वर्षे जुना Record मोडण्याची डेरिंग