भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लो स्कोरिंग झाला. पण रोहित शर्माने केलेले धुवाधार खेळी चाहत्यांच्या मनाला शांती पोहोचवणारी ठरली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांनी विक्रमी संख्येत उपस्थिती लावली. पाकिस्तान संघासाठी या सामन्यात कोणतीच गोष्टी मनाप्रामाणे होताना दिसली नाही. सामना संपल्यानंतर बाबरने रोहितचे कौतुक केलेच. पण आपल्या संघाविषयी देखील बोलला.
शनिवारी (14 ऑक्टोबर) भारताविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात पाकिस्तान संघ 42.5 षटकात 191 धावा करून सर्वबाद झाला. एकट्या बाबर आझम () याला अर्धशतक करता आले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 192 धावांचे लक्ष्य अवघ्या 30.3 षटकात गाठले. रोहित शर्मा याने 63 चेंडूत 86 धावांची खेळी केली. शतकाला अवघ्या 14 धावा कमी असताना त्याने शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर विकेट गमावली. असे असले तरी, कर्णधाराने आपली जबाबदारी चोख पार पाडली.
पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम म्हणाला, “आम्ही चांगली सुरुवात केली आणि भागीदारी देखील झाली. नेहमीप्रमाणे खेळत चांगली भागीदारी करण्याचा आमचा विचार होता. पण अचानक आम्ही एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या आणि डावाचा शेवट चांगल्या पद्धतीने करू शकलो नाही. ज्या पद्धतीने सुरुवात केली, त्या पद्धतीने सामन्याचा शेवट करू शकलो नाही. 280-290 धावा करण्याचा प्रयत्न होता, अचानक विकेट्स गमावल्याने संघाला नुकसान झाले. संघाची धावसंख्या समाधानकारक नव्हती. नवीन चेंडूने आमचे गोलंदाज हवी तशी गोलंदाजी करू शकले नाहीत. रोहितने अप्रतिम खेळी खेळली. आम्ही विकेट्स घेण्याचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही.” (Babar Azam praises Rohit Sharma after defeat India in World Cup 2023)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ.
महत्वाच्या बातम्या –
अवघ्या काही धावांनी हुकलं रोहितचं आठवं विश्वचषक शतक! पाहा शाहीनने कशी घेतली विकेट
सिक्स हिटिंग मशिन शर्मा जी! तुफानी अर्धशतकासह वनडेत ठोकली षटकारांची ‘ट्रिपल सेंच्युरी’