पाकिस्तानचा आघाडीचा फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 50 वा सामना खेळत आहे. यावेळी पाकिस्तान संघाचा कर्णधार शान मसूद याने बाबरला 50 कसोटी सामन्यांतील कामगिरीचा गौरव म्हणून खास बनवलेली कॅप आणि स्मृतिचिन्ह प्रदान केले. बाबर आपला 50 वा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे जो 14 डिसेंबरपासून पर्थमध्ये सुरू झाला आहे.
पाकिस्तान संघाची मागील कामगिरी निराशाजनक आहे. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती, त्यानंतर बाबर आझम (Babar Azam) याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडले. सध्या पाकिस्तानने शाहीन आफ्रिदी (Shaeen Afridi) याला टी20 फॉरमॅटचा कर्णधार बनवले आहे. त्याचबरोबर शान मसूद (Shan Masood) याच्याकडे कसोटी सामन्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
बाबर आझमचे 50 व्या कसोटी सामन्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या सहकारी खेळाडूंनी कौतुक केले. यावेळी कसोटी कर्णधार मसूदने बाबरबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. मसूदच्या मते, “बाबरने सध्याच्या संघातील जवळपास सर्वच खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”
Celebrating @babarazam258's feat 🌟
Special souvenir and cap presented to the top player on his 50th Test appearance by Pakistan captain @shani_official 🧢🤝#AUSvPAK pic.twitter.com/5fvE5CyMsv
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 14, 2023
बाबर आझमचा सन्मान करतानाचा व्हिडिओही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर शेअर केला आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाबर आझमने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली आणि पहिल्याच डावात 69 धावांची शानदार खेळी खेळून आपली क्षमता दाखवली. 29 वर्षीय खेळाडू बाबरने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 47.74 च्या सरासरीने 9 शतके आणि 26 अर्धशतकांसह 3772 धावा केल्या आहेत. (Babar Azam received a special honor ahead of his 50th Test with a special gift from captain Shan Masood)
महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! किडनीच्या ‘या’ गंभीर आजाराचा सामना करतोय Cameron Green, 12 वर्षांपेक्षा जास्त…
एकच मारला पण सॉलिड मारला! आफ्रिदीच्या चेंडूवर वॉर्नरने बसून ठोकला अफलातून षटकार, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्